cm face facebook, crime | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीचे बनावट फेसबूक खाते 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 20 ऑगस्ट 2017

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्याच्या नावाने (ओएसडी) बनावट फेसबूक खाते तयार करून बदनामी करणाऱ्या 32 वर्षीय आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली. आरोपीने तक्रारदार ओएसडी पैसे देण्यासाठी बॅंक खात्याची माहिती मागत असल्याच्या बनावट फेसबुक संभाषणाचा स्क्रीन शॉट तयार करून तो प्रसारीत केला होता. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात जून महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्याच्या नावाने (ओएसडी) बनावट फेसबूक खाते तयार करून बदनामी करणाऱ्या 32 वर्षीय आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली. आरोपीने तक्रारदार ओएसडी पैसे देण्यासाठी बॅंक खात्याची माहिती मागत असल्याच्या बनावट फेसबुक संभाषणाचा स्क्रीन शॉट तयार करून तो प्रसारीत केला होता. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात जून महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

महादेव विलास बालगुडे ऊर्फ देव गायकवाड असे अटक आरोपीचे नाव आहे. तो मूळचा पुण्यातील बारामती म्हसोबा नगर येथील रहिवासी आहे. तो पुणे एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होता. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावी डेअरी प्लांट उभारण्याचे काम सुरू होते. त्याची पाहणी करण्यासाठी तो तेथे गेला असता सायबर पोलिसांनी त्याला तेथून अटक केली. 

याप्रकरणी तक्रारीनुसार, 30 वर्षीय तक्रारदार ओएसडी यांनी त्यांच्या नावाचे संभाषण असलेला स्क्रीनशॉट प्रथम 3 जूनला पाहिला होता. त्यात देव गायकवाड नावाच्या व्यक्तीला पैसे देण्याची तयारी दर्शवत असल्याचे दाखवण्यात आले होते. संबंधीत खाते ओएसडी यांचे नसल्यामुळे अखेर त्यांनी याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांकडे तक्रार केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण पुढे सायबर पोलिसांना वर्ग करण्यात आले. 

असे पकडले आरोपीला 
तसापादरम्यान, तक्रारदार महिलेच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ते आरोपीने केले असावे, असा संशय सायबर पोलिसांना आला. त्यानुसार फेसबुककडे संबंधीत आयपी ऍड्रेसची माहिती मागवली असता तो बारामतीतील आरोपी काम करत असलेल्या कंपनीचा असल्याचे समजले. त्यातून एक क्रमांक पोलिसांच्या हाती लागला. तो महादेव बालगुडेचा असल्याचे निष्पन्न झाले. तेथे चौकशी दरम्यान आरोपी घरी सापडला नाही. तो कोल्हापूरमध्ये दूधाची भुकटी बनवण्याच्या प्लांटचे काम पाहण्यासाठी गेल्याचे समजले. 

त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन त्याला अटक केली. चौकशी दरम्यान आरोपीने देव गायकवाड नावाचे प्रोफाईल उघडून दाखवले असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीने स्वतः ओम देवधर नावाच्या फेसबुक प्रोफाईलला मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीचे नाव दिले. तसेच फोटोही वापरला व स्वतःच्या आणखी एक देव गायकवाड नावाच्या फेसबुकरून संदेश पाठवले. त्यामुळे ओएसडी व गायकवाड यांच्यात संभाषण सुरू असल्याचा भास निर्माण झाला. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 420, 465, 468, 469, 471 व 354(ड) सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्याच्या कलम 66(क) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. 

संबंधित लेख