मुख्यमंत्र्यांनी फसवू नये; नाणार प्रकल्प विदर्भात न्यावा : शिवसेनेची मागणी

 मुख्यमंत्र्यांनी फसवू नये; नाणार प्रकल्प विदर्भात न्यावा : शिवसेनेची मागणी

पुणे : रत्नागिरीतील नाणार प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजप या दोन्ही सत्ताधारी पक्षांत आता रण पेटले आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाणार येथे झालेल्या मेळाव्यात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रकल्पाची अधिसूचन जाहीर केल्याची घोषणा केली. त्याला तात़डीने मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देत ही अधिसूचना रद्द केले नसल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या या दाव्याला शिवसेनेने हरकत घेतली आहे. नाणार प्रकल्पाची अधिसूचना सुभाष देसाई यांनी त्यांच्या अधिकारात रद्द केली आहे. तो त्यांचा मंत्री म्हणून अधिकार आहे. त्यावर लगेच रिफायनरी रद्द केल्याचा अविर्भाव आणून मुख्यमंत्र्यांनी लोकांना फसवू  नये. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही रिफायनरी चा प्रकल्प जाहीर केला. त्या प्रकल्पाला नाणार व्यतिरिक्त कुठेही मुख्यमंत्र्यांनी नेऊन  दाखवावे. थेट विदर्भात रिफायनरी प्रकल्प नेऊन दाखवावा, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ता डॉ. प्रा. मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांनीही या प्रश्न शिवसेनेवर टीका केली होती. या टिकेलाही सेनेने उत्तर दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करून जनतेच्या मनातील भूमिका मांडली आहे. त्यावर विरोधी पक्षातील सदस्यांनी लगेच आपल्या प्रतिक्रिया देऊन पोपटपंची सुरु केली. ज्यांना आपण नेमकं काय करतोय आणि नेमके आपले मुद्दे काय हेच माहित नाही. त्यांनी उगाच पोपटपंची करू नये, मुद्देहीन असलेल्या विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रियांना आम्ही काडीची किंमत देत नाही, असेही सेनेने म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com