C.M. Devendra Phadanvis exposes Prakash mehata in assembly | Sarkarnama

गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांची सभागृहातच मुख्यमंत्र्यांनी केली पोल-खोल

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 31 जुलै 2017

मुंबई   : " एमपी मिल कंम्पाऊंडच्या फायलीवर विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी नकारात्मक शेरे मारले होते. तरीदेखील गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी ओव्हर रूल करून ही फाईल मुख्यमंत्र्यांना अवगत केली आहे मंजूर करावी असा शेरा मारला होता. पण प्रत्यक्षात याबाबत मला कुठलीही माहितीच नव्हती आणि जेव्हा माहिती मिळाली तेंव्हा मी हा निर्णय रद्द केला, " अशी   माहिती मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

त्यामुळे पोलखोल झालेल्या  गृहनिर्माण मंत्र्यांची विरोधकांनीही पुरती हजेरी घेतली. 

एखाद्या विकासकाला फायद्या मिळावा म्हणून यासारखा निर्णय घेता येणार नाही ,असा शेरा गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांनी एमपी मिल कंम्पाऊंडच्या पुर्नविकासाच्या फाईलवर मारला होता. मात्र त्याला बगल देत आपली ताकद  वापरीत गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी ही नस्ती मंजूर करावी. याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात आले आहे ,असे खोटे शेरे मारल्याचा आरोप विरोधकांनी सभागृहात केला.

यावेळी  मुख्यमंत्र्यांनीही सावध पवित्रा घेत मंत्री प्रकाश महेता यांना निवदेन करण्यास सांगितले.तेंव्हा  मंत्री प्रकाश महेता यांची पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांनी चांगलीच हजेरी घेतली.

मंत्री महोदय तुम्ही मुख्यमंत्र्याना अवगत करण्यात आले आहे हा शेरा मुख्यमंत्र्यांना विचारून मारला की परस्पर मारला याचे उत्तर द्या. यासारख्या अडचणींच्या प्रश्‍नांच्या फैरी विरोधक झाडत असताना प्रकाश मेहतांची भंबेरी उडाली होती. आणि त्यामुळे हो  किंवा नाही असे एका शब्दातील उत्तर देण्याऐवजी ते गोल-गोल बोलत होते. 

प्रकाश महेता यांच्या  या गोल-गोल उत्तरावर आक्रमक झालेल्या विरोधकांनी मंत्री मुख्यमंत्र्यांच्या परस्पर निर्णय घेत आहेत काय? मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून विकासकाला फायदा मिळवून देत आहेत का? यासारख्या प्रश्‍नाची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावी असा आग्रह धरला.

त्यावर खुलासा करताना मंत्री प्रकाश महेता यांनी आपल्याला कुठलीही माहिती दिली नव्हती हे मान्य केले. तसेच या प्रकरणाची आपण चौकशी करून योग्य ती कारवाई करू ,असे मुख्यमंत्र्यानी सभागृहात आश्‍वासन दिल्यानंतर या विषयावर पडदा पडला. 

संबंधित लेख