आजचा वाढदिवस : देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

देवेंद्र गंगाधर फडणवीस जन्म: २२ जुलै १९७० हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर नैर्ऋत्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरूण मुख्यमंत्री आहेत.
आजचा वाढदिवस : देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

देवेंद्र गंगाधर फडणवीस जन्म: २२ जुलै इ.स. १९७० हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर नैर्ऋत्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ ला वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरूण मुख्यमंत्री आहेत. राजकारण हे सामाजिक, आर्थिक बदल घडवून आणण्याचे एक साधन आहे असा फडणवीस यांचा दृढ विश्वास असून, आजपर्यंतच्या आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी याच तत्वाला अनुसरून जनतेसाठी  कार्य केले आहे.   

१९८९ भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द सुरु झाली. १९९२ ते २००१ सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य होते दोन वेळा नागपूरचे महापौर म्हणून त्यांनी काम पाहिले. १९९९ पासून ते २०१४ सालापर्यंत विधिमंडळात आमदार म्हणून निवडले गेले. आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा त्यांचा व्यासंग आहे. 

ते १७ वर्षाचे असताना फडणवीस यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकले. पाच वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवत आणि संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौरपद होण्याचा मान मिळवला.

१९९४ मध्ये ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बनले. २००१ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. २०१० भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस म्हणून त्यांची निवड झाली. २०१३ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून फडणवीस यांची नेमणूक झाली. 

देवेंद्र फडणवीस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com