छत्रपती शाहू महाराज योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात गुन्हा दाखल करू : मुख्यमंत्री 

काय आहे छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना?- छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण, कृषी, पदुम, वैद्यकीय शिक्षण अशा विभागाअंतर्गत येणाऱ्या तब्बल 605 शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये लागणाऱ्या शुल्कामध्ये 50 टक्के सवलत राज्य शासनामार्फत देण्यात आली आहे.- या वर्षापासून वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही 50 टक्के शुल्क सवलतीचा फायदा मिळणार आहे.- गेल्या वर्षी या योजनेअंतर्गत 400 कोटी रुपये खर्च झाले असून आतापर्यंत 2 लाख 30 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे.- यावर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 958 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
छत्रपती शाहू महाराज योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात गुन्हा दाखल करू : मुख्यमंत्री 

मुंबई : "छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असून शिक्षण शुल्काच्या केवळ 50 टक्के रक्कम विद्यार्थ्यांकडून घ्यावी तर उर्वरित 50 टक्के रक्कम राज्य शासन देणार आहे. परंतु ज्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून 100 टक्के शुल्क घेतले असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, त्यावर कारवाई करण्यात येईल", असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे . 

छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना ही आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लागू आहे .  शैक्षणिक संस्थांनी या योजनेची अंमलबजावणी करीत असताना विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा , असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

" उच्च व तंत्रशिक्षण विभागाने छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी सुरु केली असल्याने याचा फायदा अधिकाधिक विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. आता डीबीटी पोर्टल पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये थेट फी जमा होणार आहे. तसेच शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार शिष्यवृत्तीचे पैसे वेळेत शैक्षणिक संस्थांना जमा व्हावेत अशीच राज्य शासनाची भूमिका आहे."

" महाडीबीटी पोर्टलचे काम अंतिम टप्प्यात असून या पोर्टलमुळे विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होण्यास मदत होणार आहे. या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक संस्थांना राज्य शासनामार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यास विलंब लागत असला, तरी संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे, " असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींना  केले. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेची आढावा बैठक सोमवारी घेण्यात आली. या बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव आर. श्रीनिवास,  सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com