cm devendra fadavnis speech in nagaj | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

बारामतीचे नेते धनगर आंदोलनाकडे फिरकले नव्हते, आता ते पोपटासारखे बोलताहेत!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 डिसेंबर 2018

सिंचन योजनांबाबत पूर्वीच्या सरकारने घोळ घातला. विदर्भात पैसे येत नव्हते, आम्हाला वाटायचे पश्‍चिम महाराष्ट्रात जाताहेत. आता आम्ही इकडे पाहतोय, तर इकडेही पैसे नाहीत. त्यांनी इथे विदर्भाच्या अनुशेषाचे कारण सांगितले अन्‌ तिकडे पश्‍चिम महाराष्ट्राचे. वास्तविक, पैसे गेले कुठे हे साऱ्यांनाच कळले आहे. 
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

ढालगाव/कवठेमहांकाळ (जि. सांगली) : मराठा विरुद्ध ओबीसी आणि धनगर विरुद्ध आदिवासी असा जातीय संघर्ष भडकावण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाखल याचिका विरोधकांनीच प्रायोजित केली आहे, असा घणाघाती हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कवठे महांकाळ तालुक्‍यातील नागज येथे केला. 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सातशे कोटी रुपयांच्या रस्ते कामाची कोनशिला अनावरण आणि टेंभू उपसा सिंचन योजनेला गती देण्यात यश आल्याच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. महसूल व पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री सुभाष देशमुख, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार संजय पाटील आदी व्यासपीठावर होते. 

फडणवीस म्हणाले, "धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मी विरोधी बाकावर होतो तेव्हा बारामतीत समाजाचे लोक धरणे धरून बसले होते. आमचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी मला तेथे धाडले आणि आमचे सरकार आल्यास आरक्षणाची शिफारस केंद्राकडे तत्काळ करू, अशी ग्वाही द्यायला सांगितली. मी त्याला बांधील आहे. त्या वेळी बारामतीच्या आंदोलनाकडे बारामतीचे नेते मात्र फिरकले नव्हते. आता ते पोपटासारखे बोलताहेत. आपण जे करू शकलो नाही, ते हे कसे करताहेत, याचा त्यांना त्रास होतोय. त्यामुळे स्पॉन्सर याचिका दाखल करायला लावल्या जात आहेत.'' 
 

 
 

संबंधित लेख