cm devendra fadavnis on sangli tour | Sarkarnama

पहिल्या काही मिनिटांतच फडणवीसांनी झाडाझडती सुरू केली! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशासकीय आढावा बैठक सकाळी अकरा वाजता सुरू झाली.

सांगली : सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशासकीय आढावा बैठक सकाळी अकरा वाजता सुरू झाली. 

प्रधानमंत्री घरकुल योजना, जलयुक्त शिवारसह विविध महत्त्वाच्या योजनांचा आढावा सुरु आहे. पहिल्या काही मिनिटांतच मुख्यमंत्र्यांनी झाडाझडतीला सुरूवात केली. बैठकीला वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच कनिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले आहे.

बैठकीला पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, खासदार संजय पाटील, अप्पर मुख्य सचिव प्रवीण सिंह परदेशी, विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महापौर संगीता खोत, जिल्हाधिकारी विजय काळम, पोलीस अधीक्षक सुनील शर्मा, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अधिकारी अभिजित राऊत, महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित आहेत.  

संबंधित लेख