cm devendra fadavnis declare 100 cr to sangli corporation | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी मोबाईलवरुन सांगलीसाठी जाहीर केले 100 कोटी 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

सांगली : सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेसाठी 100 कोटींचे विशेष अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. 

सांगली : सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेसाठी 100 कोटींचे विशेष अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. 

येथील आमराई क्‍लबमध्ये नगरसेवकांच्या बैठकीत त्यांनी मोबाईल संवाद साधला. स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत नुतन नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे आदींसह भाजप नेते उपस्थित होते. यावेळी श्री देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. त्यावेळेस ध्वनीक्षेपक मोठा करून मुख्यमंत्र्यांशी सर्व नगरसेवकांचा संवाद घडवला. मुख्यमंत्र्यांनी 100 कोटी देण्याची घोषणा करतानाच लवकरच सांगली दौरा करू असे आश्वासन दिले. 
 

संबंधित लेख