C.M. Devendra Fadanvis escapes unhurt again from helicopter wing | Sarkarnama

मुख्यमंत्री   हेलिकॉप्टरचा पंखा डोक्‍याला लागता-लागता बचावले 

सरकारनामा न्युज ब्युरो 
शुक्रवार, 7 जुलै 2017

रायगड जिल्हातील अलिबाग येथे आज एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. परतत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला, अशा अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र, असा कुठलाही अपघात झाला नसून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आल्रे . 

अलिबाग:  लातूर जिल्ह्यात हेलिकॉप्टरच्या अपघाताच्या आठवणी ताज्या असतानाच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या अपघातातून थोडक्‍यात बचावले.

हेलिकॉप्टरमध्ये ते चढण्यापूर्वीच पंखा जोरात सुरू झाल्याने त्यांच्या डोक्‍याला तो पंखा लागून मोठा अपघात घडला असता, मात्र उपस्थित सुरक्षा रक्षक अधिकाऱ्यांच्या सावधगिरीमुळे मुखमंत्र्यांना बाजूला काढून घेण्यात आल्याने हेलिकॉप्टरच्या पंख्यामुळे होणाऱ्या अपघातून मुख्यमंत्री पुन्हा एकदा बचावले आहेत. 

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे ते शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठेवण्यात आलेल्या नाट्यगृहाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला ते आले होते.हा उदघाटन सोहळा संपून ते पुढे डोलवी-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी 1.55 वाजण्याच्या सुमारास, मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी निघाले.

मात्र त्याच वेळात ते हेलिकॉप्टरमध्ये चढत असतानाच हेलिकॉप्टरने उड्डाण घेण्यास सुरूवात केल्याने त्याचा पंखा वेगाने फिरायला सुरू झाला होता, यामुळे मुख्यमंत्र्यांच्या डोक्‍याला हेलिकॉप्टरचा पंखा लागून मोठा अपघात झाला झाला असता मात्र उपस्थित अधिकाऱ्यांच्या त्यांना प्रसंगावधानाने बाजूला घेतले. यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात येते.त्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा लॅन्ड करुन फॅनची रिटेस्ट घेऊन त्याच हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री फडणवीस मुंबईला रवाना झाले. 

 

संबंधित लेख