cm daura | Sarkarnama

माणदेशाला हवा सिंचनप्रकल्पांसाठी निधी ! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 मे 2017

मलवडी (जि. सातारा) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी माण तालुका दौऱ्यावर आहेत. या अनुषंगाने उरमोडी, जिहे- कटापूर या उपसा सिंचन योजनांबरोबरच जलयुक्त शिवारला भरभरून निधी मिळण्याची जनतेला आशा आहे. 

मलवडी (जि. सातारा) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी माण तालुका दौऱ्यावर आहेत. या अनुषंगाने उरमोडी, जिहे- कटापूर या उपसा सिंचन योजनांबरोबरच जलयुक्त शिवारला भरभरून निधी मिळण्याची जनतेला आशा आहे. 

किरकसाल (ता. माण) येथे जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामांची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. या दौऱ्यामुळे जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 
"दुष्काळमुक्त महाराष्ट्र 2019' या टॅग लाईनखाली विशेषतः दुष्काळी भागामध्ये ही योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. 2015-16 या पहिल्या वर्षी माणमधील 24 गावांची निवड झाली. या 24 गावांमध्ये शासन व लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. 17 कोटी 64 लाखांचा आराखडा असताना प्रत्यक्षात 33 कोटी 75 लाख रुपये खर्च करण्यात आले. 2016-17 मध्ये 46 गावांची निवड करूनही आतापर्यंत फक्त 22 कोटी 54 लाख रुपये खर्च करण्यात आलेत. 2015-16 मध्ये 1221 कामांचे उद्दिष्ट असताना 1497 कामे पूर्ण झाली. 2016-17 मध्ये 3475 कामांचे उद्दिष्ट असताना फक्त 616 कामेच पूर्ण झाली आहेत. मुदत संपल्यानंतर या गावांचा पुन्हा "जलयुक्त'मध्ये समावेश होणार नाही. त्यामुळे या गावांतील कामांचे काय असा प्रश्‍न आहे. 
 

संबंधित लेख