CM congratulates nilima gaykwad | Sarkarnama

नीलिमाच्या कामगिरीचा मुख्यमंत्र्यांनाही अभिमान

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

पुणे : पोलिस दलातील अनेक कर्मचाऱ्यांच्या अतुलनीय कामगिऱ्या दुर्लक्षित राहतात. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका महिला काॅन्स्टेबलच्या कामगिरीची आवर्जून आठवण ठेवत तिचा आज सत्कार केला.

पुणे : पोलिस दलातील अनेक कर्मचाऱ्यांच्या अतुलनीय कामगिऱ्या दुर्लक्षित राहतात. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका महिला काॅन्स्टेबलच्या कामगिरीची आवर्जून आठवण ठेवत तिचा आज सत्कार केला.

पुणे पोलिस दलातील कॉन्स्टेबल नीलिमा गायकवाड यांनी 28 सप्टेंबर रोजी मुळा-मुठा कॅनलमधून पाण्याचा अचानक विसर्ग झाल्याच्या घटनेप्रसंगी एका लहान बालकाला आपल्या खांद्यावर घेऊन इतरही सात-आठ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचा अतुलनीय पराक्रम केला. त्यांच्या या शौर्याचा आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला. याशिवाय, आणखी एक कॉन्स्टेबल संतोष सूर्यवंशी यांनीही याचदिवशी तीन मुलं आणि त्यांच्या मातांचे प्राण वाचविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचाही सत्कार केला.

मुख्यमंत्री आज पुण्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी आवर्जून हा सत्कार ठेवला. पालकमंत्री गिरीश बापट, पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र गायकवाड यांनी दिले. गायकवाड यांची कामगिरी अतुलनीय असून, त्या कामगिरीचा अभिमान असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. गायकवाड या दत्तावाडी पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहेत.  

संबंधित लेख