cm chair is safe | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांची खुर्ची सुरक्षित ? 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

मुंबई ः राज्यात उसळलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले असले तरीही त्यांच्या खुर्चीला कोणताही धोका नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जोपर्यंत वरदहस्त आहे, तोपर्यंत फडणवीस यांच्या खुर्चीला कोणताही धोका नाही. या चार वर्षांत, अगदी अलीकडे झालेली लोकसभेची पालघर पोटनिवडणूक ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले आहे. यामुळे त्यांच्या स्थानाला कोणताही धोका नाही, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. 

मराठा आंदोलन हाताळण्यात फडणवीस यांना अपयश आल्याचा आरोप करीत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

संबंधित लेख