cm in aurangabad | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे मुख्यमंत्र्यांकडून संकेत

सरकारनामा ब्युरो
रविवार, 17 सप्टेंबर 2017

मंत्रिमंडळ विस्तार करतांना मंत्र्यांच्या कामगिरीचे मुल्यमापन केले जाणार आहे. त्यासाठी केआरए आणि एक प्रश्‍नावली तयार करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मराठवाड्याचा अनुशेष व त्यावर चर्चा करण्यासाठी मराठवाड्यात घेतली जाणारी मंत्रिमंडळाची बैठक अद्याप घेण्यात आलेले नाही याकडे लक्ष वेधले असता अशी बैठक औरंगाबादेत लवकरच घेणार असल्याचे फडवणीस म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्यात असून ऑक्‍टोबर अखेर शेतकरी कर्जमुक्त होईल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

औरंगाबाद : राज्यातील बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार लवकरच करण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलतांना दिले. शिवाय मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक देखील लवकरच घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले 
मराठवाडा मुक्ती संग्रामदिना निमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज (ता. 17) सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर, आमदार अतुल सावे, आमदार सुभाष झाबंड आदींची उपस्थिती होती. 

राज्यात सुरु असलेले वीजेचे भारनियमन, मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक आणि मंत्रिमंडळाचा विस्तार याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विविध प्रश्‍न विचारले. भारनियमनाच्या प्रश्‍नाला बगल देत त्यांनी त्यावर बोलणे टाळले. मात्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येईल, परंतु त्याची निश्‍चित तारीख आज सांगता येणार नाही असेही स्पष्ट केले. 

मंत्रिमंडळ विस्तार करतांना मंत्र्यांच्या कामगिरीचे मुल्यमापन केले जाणार आहे. त्यासाठी केआरए आणि एक प्रश्‍नावली तयार करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मराठवाड्याचा अनुशेष व त्यावर चर्चा करण्यासाठी मराठवाड्यात घेतली जाणारी मंत्रिमंडळाची बैठक अद्याप घेण्यात आलेले नाही याकडे लक्ष वेधले असता अशी बैठक औरंगाबादेत लवकरच घेणार असल्याचे फडवणीस म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्यात असून ऑक्‍टोबर अखेर शेतकरी कर्जमुक्त होईल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी लढा द्यावा लागेल 
मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणानंतर बोलतांना श्री. फडणवीस यांनी भ्रष्टाचार, दहशतवाद आणि शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्त करण्यासाठी आज एकत्रित लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. देश 1947 ला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, पण मराठवाड्याला जुलमी निजामाच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी 17 सप्टेबर 1948 उजाडावे लागले. या लढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा झाले. आता आपल्या पिढीने विकासासाठीच्या संघर्षामध्ये सहभागी होऊन एकत्रितपणे लढले पाहिजे असे आवाहन फडणवीस यांनी केले. 

संबंधित लेख