सोशल मीडियावर अभिनेत्री केतकी चितळे व  महिलांना अश्‍लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांवर  कडक कारवाई करू : मुख्यमंत्री

सोशल मीडियावर डमी अकाऊंटद्वारे महिला अभिनेत्री आणि महिलांना अश्‍लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहीती शिवसेना उपनेत्या नीलम गो-हे यांनी दिली. सोशल मीडियावर अभिनेत्री केतकी चितळेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत केतकीने तिला फेसबूकवर अश्‍लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांची माहिती दिली आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री केतकी चितळे व  महिलांना अश्‍लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांवर  कडक कारवाई करू : मुख्यमंत्री

मुंबई : सोशल मीडियावर डमी अकाऊंटद्वारे महिला अभिनेत्री आणि महिलांना अश्‍लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहीती शिवसेना उपनेत्या नीलम गो-हे यांनी दिली. सोशल मीडियावर अभिनेत्री केतकी चितळेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत केतकीने तिला फेसबूकवर अश्‍लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांची माहिती दिली आहे. या प्रकरणी ट्रोलरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गो-हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळासह भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री यांनी सोशल मीडियावर डमी आणि खोट्या अकाउंटवरून अश्‍लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांवर अटक करून कडक कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त क्राईम यांना तात्काळ सूचना दिल्या आहेत. तसेच डमी अकाउंटद्वारे महिलांचे विनयभंग करणाऱ्यांवर कडक करवाईचे आश्वासन दिल्याचे गो-हे यांनी सांगितले. या शिष्टमंडळात अभिनेत्री केतकी चितळे, अभिनेता दिगंबर नाईक, सुशांत शेलार, प्रकाश वालावलकर हे उपस्थित होते. शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदनही सादर केले.

सध्या सोशल मीडियावर खोट्या आणि डमी नावाने अकाउंट उघडून महिला व महिला अभिनेत्रींना अश्‍लील भाषेत व खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल होत असलेले अकाउंट बंद करून यांना शोधून युजर्सवर कडक कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत, त्याचप्रकारे याचे दुष्परिणामही समोर येताना दिसत आहेत. यात सोशल मीडियावर डमी व खोटे अकाउंट तयार करून काही माथेफिरु महिलांना त्रास देण्यासाठी सुरू केले असल्याचा संशय आहे. असे असले तरी काही व्यक्ती नावाने देखील महिलांना अश्‍लील भाषेत संभाषण करताना दिसत आहेत. अशा मंडळीवरही कारवाई करण्याचीही मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे मागणी केली की, सोशल मीडियावर महिलांना अश्‍लिल भाषा वापरणाऱ्या खात्यांच्या युजर्सवर कलम आयटी 67 नुसार कारवाई करण्यात येत आहे, परंतु कलम 66 (अ) रद्द झाल्यामुळे कडक कारवाई करण्यासाठी समस्या निर्माण होत आहेत. आयटी ऍक्‍ट कडक करण्यासाठी शासनाने पावले उचलावीत. शिवाय, सोशल मीडियावरील खोटे अकाऊंट बंद करण्यासाठी फेसबुकने पुढाकार घेतला आहे. परंतु, ट्‌विटर तसेच इन्स्टग्राम व इतर सोशल मीडियावरील अकाऊंट खोटे व डमी अकाउंट बंद करण्यासाठी सरकारने पाठपुरावा करावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com