CM Assures Chagan Bhujbal To Re-Survey Drought Area in Yeola | Sarkarnama

येवला, निफाडच्या दुष्काळाची फेरपाहणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे भुजबळांना आश्वासन  

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

नाशिक जिल्ह्यातील येवला व निफाडसह विविध तालुक्‍यांत तीव्र दुष्काळ आहे. मात्र, या तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर न केल्यामुळे छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना येथील वस्तुस्थितीबाबत पत्र पाठवून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. कालच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने येवला येथे दुष्काळाबाबत मोर्चासुद्धा काढला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पथक पाठवण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

नाशिक : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळ सदृष्य तालुक्‍यांच्या यादीत येवला आणि निफाडचा समावेष नाही. या तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थितीची फेरपाहणी करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने पथक पाठवण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे. 

नाशिक जिल्ह्यातील येवला व निफाडसह विविध तालुक्‍यांत तीव्र दुष्काळ आहे. मात्र, या तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर न केल्यामुळे छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना येथील वस्तुस्थितीबाबत पत्र पाठवून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. कालच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने येवला येथे दुष्काळाबाबत मोर्चासुद्धा काढला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पथक पाठवण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'नाशिक जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, देवळा, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, नाशिक व सिन्नर या आठ तालुक्‍यांमध्ये पीक कापणी प्रयोग हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पीक कापणी प्रयोगामध्ये येवला व निफाड तालुक्‍यांचा समावेश करण्यात आलेला नाही. नॅशनल सेंटर फॉर क्रॉप फोरकास्टिंग या संस्थेकडून मिळालेल्या पीक पाण्याच्या स्थितीनुसार दुष्काळ सदृश्‍य तालुके जाहीर करण्यात येणार आहे. कोल्हापूरच्या राधानगरी व गगनबावडा या तालुक्‍यांमध्ये अतिवृष्टी होवूनही त्यांचा दुष्काळसदृश्‍य यादीत समावेश आहे. येवला तालुक्‍यात तीव्र दुष्काळ असल्यामुळे पावसाळ्यात गावांना पिण्यासाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. त्याचा दुष्काळसदृश्‍य यादीत समावेश नाही हे अत्यंत संतापजनक आहे.'

संबंधित लेख