मुख्यमंत्र्यांना भावली अशोक उईके यांची कार्यशैली; गटातटापासून अलिप्त

गटातटाच्या राजकारणात न अडकता सर्वांना सोबत घेऊन चालणे, पक्ष संघटन मजबुत करणे तसेच राष्ट्रीय स्वयसेवक संघाशी असलेली जवळीक तसेच काम करण्याची पद्धत मुख्यमंत्र्यांना भावल्याने प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली.
मुख्यमंत्र्यांना भावली अशोक उईके यांची कार्यशैली; गटातटापासून अलिप्त

यवतमाळ : गटातटाच्या राजकारणात न अडकता सर्वांना सोबत घेऊन चालणे, पक्ष संघटन मजबुत करणे तसेच राष्ट्रीय स्वयसेवक संघाशी असलेली जवळीक तसेच काम करण्याची पद्धत मुख्यमंत्र्यांना भावल्याने प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. 

जवळपास वर्ष दीड वर्षांपासून मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती. अनेकदा मुहूर्त ठरले मात्र विस्तार झाला नाही. ज्या वेळी विस्ताराची चर्चा झाली, त्यावेळी प्राचार्य डॉ. अशोक उईके यांचे नाव चर्चेत राहिले. यावेळीतर नाव आघाडीवर होते. त्याला कारणही तसेच आहे. 2014 मध्ये आमदार झाल्यानंतर उईकेने जिल्ह्यातील गटातटाच्या राजकारणात न पडता अलिप्त राहणे पसंत केले. मतदार संघाबाहेर न डोकावता आपल्या मतदार संघात पक्षसंघटन मजबुत करण्यावर भर दिला. त्यांचा परिणाम राळेगाव तसेच कळंब नगरपंचायतीच्या निवडणुकीत दिसून आला. 

2014 तसेच 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांचे मताधिक्य मोठे होते. यासोबत राष्ट्रीय स्वयसेवक संघांशी असलेली जवळीक, आदिवासी समाजाती उच्च शिक्षित चेहरा याही उईके यांच्या जमेच्या बाजू ठरल्या. यापेक्षाही विधीमंडळ अनू जमाती कल्याण समितीचे अध्यक्षपदांची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी केलेल्या कामांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. साडेचार वर्षांत उईकेची काम करण्याची पद्धत, सर्वांना सोबत घेण्याची कसब आदी बाबी मुख्यमंत्र्यांना भावल्यांने त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com