मराठा युवकांनी टोकाचे पाऊल उचलू नये, देवेंद्र फडणविसांचे आवाहन 

मराठा युवकांनी टोकाचे पाऊल उचलू नये, देवेंद्र फडणविसांचे आवाहन 

मुंबई : मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. मराठा समाजाच्या सर्वच मागण्यांसाठी सरकार सकारात्मक आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. 

मराठा समाजाच्या विविध मागण्या व मराठा युवकांनी आत्महत्या करू नये यासाठी काकासाहेब मात्रे पाटील या तरुणाने औरंगाबाद ते मुंबई अशी पदयात्रा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांची येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात आज भेट घेऊन काकासाहेब यांनी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले. मराठा समाजाच्या सर्वच मागण्यांवर शासन सकारात्मक असून विविध निर्णयांची अंमलबजावणी होत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

बाळापूर (ता. जि. औरंगाबाद) येथील काकासाहेब पंडीत मात्रे-पाटील यांनी 1 सप्टेंबरपासून औरंगाबाद येथील क्रांती चौकातून पायी प्रवास सुरु केला होता. त्यांनी आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी काकासाहेब यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर सर्वच मागण्यांवर शासन सकारात्मक आहे. विविध निर्णयांची अंमलबजावणीही सुरु झाली आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना काकासाहेब म्हणाले, मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मराठा समाजाच्या मागण्या निश्‍चित पूर्ण होऊ शकतील. त्यामुळे मराठा तरुणांनी नैराश्‍य न बाळगता वाटचाल करावी. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. यामुळे कुटुंबाचे मोठे नुकसान होते. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलाल तर जेव्हा आरक्षण लागू होईल तेव्हा त्याचा उपयोग कोणाला होणार, असे भावनिक उद्‌गार यावेळी काकासाहेब यांनी काढले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com