cm appeal maratha community cheers on 1 december | Sarkarnama

 आंदोलन कसले करता ? 1 डिसेंबरला जल्लोष करा ! मुख्यमंत्र्यांचे मराठा आंदोलकांना आवाहन 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

नगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन काही लोक आंदोलन करीत आहेत. आंदोलन काय करता ? आंदोलन करण्यापेक्षा 1 डिसेंबरला जल्लोष करा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नगरमध्ये केले. 

मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य मागास आयोगाकडून आज (गुरुवार) राज्य सरकारकडे सुपूर्त करण्यात आला. या अहवालाचा अभ्यास करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांनी सांगितले. 

'मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) यादीत समावेश करावा. "ओबीसी'च्या सध्याच्या आरक्षणाची मर्यादा वाढवून राज्य सरकारने नागराज खटल्याचा आधार घ्यावा,'' अशा ठोस शिफारशी राज्य मागास आयोगाच्या अहवालात असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर फडणवीस म्हणाले, की मराठा आरक्षणाबाबत आताच अहवाल सादर झाला आहे. काही लोक श्रेय घेण्याचे काम करत आहेत. मात्र त्यांनी श्रेय घेण्याच काम करू नये. येत्या काही दिवसात उर्वरीत कार्यवाही देखील करण्यात येईल. काही लोक लोक आंदोलन करता आहेत. पण, आंदोलन काय करता ? सरकार निर्णय घोणार आहे.आंदोलन करण्यापेक्षा 1 डिसेंबरला जल्लोष करा. 

संबंधित लेख