cm and thakare | Sarkarnama

पंढरपूरमध्ये पुढच्या आठवड्यात ठाकरे व मुख्यमंत्र्यांची स्वतंत्रपणे सभा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पंढरपूर : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सर्वच पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. त्यातच राज्यातील दुष्काळी पस्थितीमुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांचे राज्यभरात दौरे सुरु आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर येत्या पंधरा दिवसांमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर प्रमुख पक्षांच्या नेत्यांची पंढरीत मांदियाळी होणार आहे. 

पंढरपूर : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सर्वच पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. त्यातच राज्यातील दुष्काळी पस्थितीमुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांचे राज्यभरात दौरे सुरु आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर येत्या पंधरा दिवसांमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर प्रमुख पक्षांच्या नेत्यांची पंढरीत मांदियाळी होणार आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची येत्या 24 डिसेंबर रोजी पंढरपुरात जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 17 डिसेंबर रोजी विठ्ठल मंदिर समितीने सुमारे 75 कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या भव्य अशा भक्तनिवास आणि राज्य शासनाने उभारलेल्या तुळशी वनाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंढरीत येणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंढरपुरात येऊन विठ्ठल दर्शन घेतले.यावेळी त्यांनी राज्यात आणि केंद्रात शेतकर्यांना न्याय देणाऱ्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे सरकार येऊ दे असे विठ्ठलाला साकडे घातले. 

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पंढरपुरात होणाऱ्या जाहीर सभेची तयारी सुरु आहे. सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि ठाण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आज पंढरपुरात येणार आहेत. ठाकरे यांच्या सभेच्या निमित्ताने मंत्री,आमदार आणि खासदार ही पंढरीत येणार आहेत. ठाकरेंच्या सभेमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. 

दुसरीकडे विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष तथा कराड येथील भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्यातील भाजप कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने भाजप मधील अंतर्गत गटबाजीवर चर्चा होण्याची शक्‍यता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनीही कार्यकर्त्यांच्या पंढरीत मेळाव्याचे आयोजन केल आहे. तर बहुजन वंचित आघाडीच्या वतीने भारिप बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडरकरांची याच काळात जाहीर सभा होणार आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये पंढरपुरात सर्वच प्रमुख राजकीय नेत्यांची मांदियाळी भरणार आहे. 

मुख्यमंत्री 17 ला विठ्ठलाची महापूजा करणार 
मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेची संधी हुकली होती. आषाढीवारी नंतर कार्तिकीसाठी मुख्यमंत्री येतील असा अंदाज होता. परंतु त्याहीवेळी मुख्यमंत्र्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना शासकीय महापूजा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता 17 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री विठ्ठल मंदिर समितीच्या कार्यक्रमासाठी पंढरीत येत आहेत. यावेळी त्यांच्याहस्ते विठ्ठलाची महापूजेच्या करण्याची तयारी मंदिर समितीने सुरु केली आहे. 

संबंधित लेख