cm and mla of bjp | Sarkarnama

भाजपच्या आमदारांना हवाय मुख्यमंत्र्यांचा वेळ...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कामे अत्यंत चांगली आहेत, मात्र त्याच वेळी ते आम्हाला वेळ देण्यात कमी पडत असल्याची खंत आमदारांच्या मनात आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा फारसा प्रभाव पडत नसल्याने महाराष्ट्रात सध्या भाजपकडे एकच सत्ताकेंद्र आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. ते राज्यासाठी परिश्रम घेत आहेत. मध्यरात्रीपर्यंत स्वत:ला कामात गुंतवून घेत आहेत मात्र त्यांच्याशी संपर्क साधणे कठीण होते. 

ते कामात असल्याने त्यांना वेळ देणे शक्‍य होत नाही. त्यांनी स्वत:ची प्रतिमा चांगली ठेवली आहे, त्यासाठीच ते मध्यस्थ ठेवत नाहीत. मात्र त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्याभोवती कोणीही नसते. आम्हाला त्यांच्यासाठी काम करायचे आहे पण त्यांच्या जवळ जावे तरी कसे असा प्रश्‍न समोर येतो अशी कैफियत एका ज्येष्ठ भाजप नेत्याने मांडली. 

नव्याने निवडून आलेल्यांना तर त्यांच्याबददल प्रचंड आत्मीयता आहे,त्यांनी आमदारांना अधिकाधिक वेळ दयावा अशी इच्छा आहे. भाजप आमदारांच्या बैठकीत ठराव तर मांडला जाईलच पण त्यांनी आम्हाला वेळ दयावा असेही आम्ही त्यांची व्यक्‍तीगत भेट घेवून सांगणार आहोत असेही काही आमदारांनी ठरवले आहे. त्यांनी वेळ मात्र काढायला हवे असेही आमदार म्हणताहेत. 

संबंधित लेख