स्वच्छ सर्वेक्षणात देशात नवी मुंबई 8 व्या तर मुंबई 29 व्या क्रमांकावर- यादीत भुसावळ शेवटून दुसरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात मध्यप्रदेशातील इंदूरने देशात पहिला क्रमांक पटकावला असून भोपाळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत महाराष्ट्रातील 45 शहरे आहेत. या शहरांमधील स्थानिक स्वराज्य संस्था स्वच्छतेला किती महत्त्व देतात हे या यादीवरुन दिसून येते आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात देशात नवी मुंबई 8 व्या तर मुंबई 29 व्या क्रमांकावर- यादीत भुसावळ शेवटून दुसरे

पुणे - केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज स्वच्छ सर्वेक्षणाची यादी जाहीर केली असून त्यात राजधानी मुंबईचा देशात 29 वा क्रमांक आहे. तर पुणे शहर तेराव्या क्रमांकावर आहे. पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये केवळ नवी मुंबईचा समावेश असून स्वच्छ शहरांच्या यादीत या शहराचा 8 वा क्रमांक आहे. उत्तर प्रदेशातील गोंडानंतर भुसावळची सर्वात अस्वच्छ शहर म्हणून 'निवड' करण्यात आली असून या यादीत या शहराचा शेवटून दुसरा म्हणजेच 433 वा क्रमांक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात मध्यप्रदेशातील इंदूरने देशात पहिला क्रमांक पटकावला असून भोपाळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत महाराष्ट्रातील 45 शहरे आहेत. या शहरांमधील स्थानिक स्वराज्य संस्था स्वच्छतेला किती महत्त्व देतात हे या यादीवरुन दिसून येते आहे.

महाराष्ट्रातील शहरे व देशपातळीवरील क्रमांक खालील प्रमाणे
नवी मुंबई - 8
पुणे- 13
बृहन्मुंबई - 29
शिर्डी - 56
पिंपरी चिंचवड - 72
चंद्रपूर - 76
अंबरनाथ - 89
सोलापूर - 115
ठाणे - 116
धुळे - 124
मीरा-भायंदर - 130
नागूप - 137
वसई विरार- 139
इचलकरंजी - 141
नाशिक - 151
सातारा - 157
कुलगाव बदलापूर- 158
जळगाव - 162
पनवेल - 170
कोल्हापूर- 177
नंदूरबार- 181
अहमदनगर - 183
नांदेड वाघाळा - 192
उल्हासनगर - 2017
उस्मानाबाद - 219
परभणी- 229
यवतमाळ - 230
अमरावती- 231
कल्याण डोंबिवली - 234
सांगली मिरज कुपवाड - 237
मालेगाव - 239
उद्गीर - 240
बार्शी - 287
अकोला - 296
औरंगाबाद - 299
बीड - 302
अचलापूर- 311
वर्धा - 313
लातूर - 318
गोंदिया - 343
हिंगणघाट - 355
जालना - 368
भिवंडी निझामपूर- 392
भुसावळ - 433

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com