मंत्रालयात नगरविकास विभागात हाणामारी

मंत्रालयात नगरविकास विभागात हाणामारी

मुंबई : मंत्रालयात नगरविकास विभगातील उपसचिव आणि क्षेत्रीय कार्यालयातील निलंबीत अधिकारी यांच्यात शाब्दीक बाचाबाचीसह हाणामारी झाली. अखेर पोलिसांना बोलावून ही भांडणे सोडवण्यात आली. यामुळे मंत्रालयातील नगरविकास विभागाचे चांगलेच हसे झाले आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेतील सहायक नगर नियोजन अधिकारी म्हणून असलेले चव्हाण नावाच्या अधिका-यास काही कारणामुळे बडतर्फ करण्यात आले होते. याबाबत नगरविकास विभागातील उपसचिव श्रीराम यादव यांच्याकडे चव्हाण काहीतरी विचारणा करीत होते.

यादव यांच्याकडे नगरविकास विभागातील नगररचनकार अधिका-यांच्या आस्थापनाबाबतचा पदभार आहे. त्यामुळे यादव यांच्या केबीनमध्ये प्रवेश करून चव्हाण यांना काही विचारण्यात आले. मात्र यात चव्हाण यांचे समाधान झाले नसल्याने त्यांच्यात आणि यादव यांच्यामध्ये केबीनमध्ये तुतुमैमै सुरू झाली. शब्दांनीशब्द वाढत गेल्यानंतर आवाज वाढला. मुद्यांची भाषा गुद्यावर आली आणि एकेमेकात शिवीगाळ सुरू झाली. तिचे पर्यवसान बकोटे पकडण्यापर्यंत गेले.

हा प्रकार सुरू असताना या विभागातील कर्मचा-यांनी मंत्रालय सुरक्षा विभागाला कळवल्यानंतर मंत्रालयातील सुरक्षेला असलेले पोलिस अधिकारी आले. त्यांनी दोघांना समजावून सांगत दोघांचे जाबजबाब घेतले. पुढील चौकशी सुरू आहे. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. या दोन अधिका-यांमधील वादाचे कारण समजू शकले नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com