Clash between MLA Narayan Patil and Rashmi Bagal | Sarkarnama

करमाळा :आमदार नारायण पाटील आणि  रश्मी बागल यांच्यात चकामक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

 रश्मी बागल यांच्या फिर्यादीत असे  म्हटले आहे की,कुकडीच्या पाण्याच्या मागणीचे निवेदन देत असताना आमदार नारायण पाटील यांना कुकडीचे पाणी ,व उजनीचे पाणी विषयी विचारले असताना त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारण्यासाठी हात उगरला.

सोलापूर :करमाळा येथे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर आमदार नारायण पाटील यांना मागणीचे निवेदन देताना आमदार नारायण पाटील व जिल्हा बॅकेच्या संचालिका रश्मी बागल ,दिग्विजय बागल यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

कुकडी प्रकल्पातील पाण्याचे उन्हाळयातील आवर्तन करमाळा तालुक्यास मिळावे  या मागणीसाठी आज १मे महाराष्ट्र दिनी तहसिल कार्यालयात  ध्वजारोहन समारंभास उपस्थित असलेल्या आ.नारायण पाटील यांना  जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी बागल-कोलते,मकाई सह,साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी घेराव घालून निवेदन दिले . तेंव्हा  शिवसेनेचे आ.नारायण पाटील यांनी  रश्मी बागल यांच्या वर हात उगारून अपशब्द उच्चारले .  

यावरून रश्मी बागल यांनी आमदार नारायण पाटील यांच्या विरोधात  पोलिसात तक्रार दिली असुन आमदार नारायण पाटील यांच्या विरोधात अदखलपाञ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 रश्मी बागल यांच्या फिर्यादीत असे  म्हटले आहे की,कुकडीच्या पाण्याच्या मागणीचे निवेदन देत असताना आमदार नारायण पाटील यांना कुकडीचे पाणी ,व उजनीचे पाणी विषयी विचारले असताना त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारण्यासाठी हात उगरला.

याबाबत आमदार नारायण पाटील यांच्या विरोधातभारतीय दंड विधानाच्या कलमानुसार  504  अदखलपाञ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तर आमदार नारायण पाटील यांना अपशब्द वापरल्या बद्दल आमदार नारायण पाटील यांचे अंगरक्षक श्री.प्रशांत किरवे यांनी पोलिसात तक्रार दिली असुन रश्मी बागल, दिग्विजय बागल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 प्रशांत किरवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम संपुन जात असताना आमदार नारायण पाटील रश्मी बागल व दिग्विजय बागल यांनी गैरकायद्याने जमाव  जमवून कुकडीच्या पाण्याच्या संदर्भात अडवुन घेराव घालुन अर्वाच्य भाषा वापरून अपमानित केले. तु चेष्टेने आमदार झाला असे वक्तव्य दिग्विजय बागल यांनी केले .

याबाबत दिग्विजय बागल व रश्मी बागल यांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 504,341,143,147,149 अन्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बडाख करत आहेत.

  बागल गटाचे नेते व मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी कुकडी प्रकल्पातील पाणी,उजनी धरण काठावरील शेती पंपाना वीजेचा अपुरा व कमी दाबाने होणारा पुरवठा या प्रश्नी आ.नारायण पाटील यांना १ मे,महाराष्ट्र दिनी जाब विचारण्यासाठी घेराव आंदोलन करण्याचा  इशारा गेल्या सप्ताहात दिला होता.

  आज १ मे,महाराष्ट्र दिना निमित्त तहसिल कार्यालयाच्या कवायत मैदानावर आ.नारायण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन समारंभ पार पडला त्यानंतर  आ.नारायण पाटील यांना पोलिसांनी मानवंदना दिली .  आ.पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांना प्रथेनुसार तहसिल कार्यालयात चहापाण्यासाठी तहसिलदार संजय पवार यांना निमंञित केले .

  तेथे सर्वजण जात असताना तहसिल कार्यालयाच्या वेशीसमोर रश्मी बागल-कोलते,दिग्विजय बागल यांच्यासह दशरथ कांबळे,रमेश कांबळे,हनुमंत बागल,संतोष वारे,सचिन घोलप,संतोष देशमुख आदिनी आ.पाटील यांना घेराव घातला . रश्मी बागल,दिग्विजय बागल यांनी कुकडी च्या अवर्तनाचा जाब विचारला असताना आ.पाटील यांनी निवेदन घेऊन तुम्ही कारखान्याचे काय केले असा सवाल केला .  त्यामुळे आ.पाटील व रश्मी बागल-कोलते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

आ.पाटील यांनी दुष्काळात  पाणी मागणी करणा-यांचा व महिलांचा अपमान केला असल्याने आ.पाटील जो पर्यंत  आमची माफी मागत नाही तो पर्यंत आम्ही येथून उठणार नाही असे दिग्विजय बागल यांनी जाहीर केले .  तहसिल कार्यालयासमोर रश्मी बागल-कोलते याच्यासह कार्यकर्त्यांनी बैठक मारली.  

तहसिल कार्यालयातून आ.पाटील बाहेर आल्यानंतर दिग्विजय बागल यांनी पुन्हा आ.पाटील यांना  पाणी प्रश्नावर छेडले .  यावेळी बागल समर्थकांनी आ.नारायण पाटील यांच्या निषेधार्थ  घोषणा दिल्या .  तेंव्हा  आ.पाटील यांनी चिडले आणि बागल दाम्पत्याला उद्देशून संतापाने बोलले . तसेच अपशब्दही उच्चारले .  त्यामुळे पुन्हा  दिग्विजय बागल व आ.पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाली .  यावेळी पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप व पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी होता . पोलीस निरीक्षकांनी दोन्ही बाजूनं समजावून  पुढील अनर्थ टाळला .
  

संबंधित लेख