clash betewwn ashvini kadam and wabale | Sarkarnama

दिवे कोणी लावायचे यावरून नगरसेविका अश्विनी कदम व नगरसेवक वाबळे या दोघांत वाद

ज्ञानेश सावंत
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पुणे : आपल्या प्रभागाचा परिसर उजळविण्यासाठी नगरसेवक मंडळी गल्लीबोळात दिवे लावल्यावरून राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्‍विनी कदम आणि भाजपचे नगरसेवक महेश वाबळे यांच्यातील राजकीय संघर्षाला तोंड फुटले आहे.

"निधी संपविण्यासाठी हा उद्योग केल्याचा आरोप कदम यांचा आहे. तर, राजकीय हेतूने माझी कामे झाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रत्यारोप वाबळे यांनी केला. हे दोघेही सहकारनमधील एकाच प्रभागातून निवडून आले आहेत. विकासकामांच्या निधीवरून नगरसेवकांमध्ये जुंपल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

जेमतेम तीन वर्षांपूर्वी कदम यांनी आपल्या वॉर्डस्तरीय निधीतून विजेचे खांब उभारले आहेत. मात्र, ते काढून नवे खांब बसविण्याची योजना वाबळे यांनी राबविली. लोकांना विकासकामे दाखविण्याच्या स्पर्धेतून या दोघांमध्ये चढाओढ सुरू आहे. विशेष म्हणजे, प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही नेहमीप्रमाणे डोळेझाक करीत योजना मंजूर केली. या विषयावरून  कदम संतप्त झाल्या. 

महापालिकेच्या उत्पन्नात गेल्या वर्षी पावणेदोन हजार कोटी रुपयांची तूट आली आहे. त्यामुळे या वर्षी अनावश्‍यक कामे न करता महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यावर भर राहील, असे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते. त्यामुळे प्रभागांतील किरकोळ कामांवर पैशांची उधळपट्टी होणार नाही, अशी आशा होती. प्रत्यक्षात मात्र, वस्तुस्थिती नेमकी उलट असल्याचे नगरसेवकांच्या कामांवरून आढळून आले आहे.

सहकारनगरमधील नगरसेविका कदम यांनी वार्डस्तरीय निधीतून 2015 मध्ये विजेचे खांब उभारण्यात आले. त्यासाठी 15 लाख रुपये खर्चही केला. खांबांचा दर्जा पाहता आणखी सहा-सात वर्षे तरी, ती बदलण्याची आवश्‍यकता नाही, तरीही लाखो रुपयंची तरतूद घेत खांब बदलली आहेत. त्यासाठी वाबळे यांनी पुढाकार घेतल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाने सांगितले. 

कदम म्हणाल्या, ""या भागात तीन वर्षांपूर्वी खांब बसविले असतानाही ते काढले आहेत. ज्या खांबांची स्थिती चांगली आहे. मात्र, निधी संपविण्यासाठीच ही कामे केली आहेत. त्यामुळे एवढ्या प्रमाणात निधी वाया गेला आहे. '' 

नगरसेवक महेश वाबळे म्हणाले, ""लोकांच्या मागणीनुसार प्रभागात कामे केली जातात. 1987 मध्ये बसविले खांब बदलले आहेत. मात्र, काही खांब सात वर्षापूर्वीचे काढले आहेत. केवळ राजकीय वादातून माझ्यात खोडा घातला जात आहे.'' 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख