citizenship issue mizoram agitation | Sarkarnama

नागरिकत्व विधेयकावरून मोदींच्या पुतळ्यांचे दहन

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 जानेवारी 2019

ऐजॉल: नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या विरोधात मिझोराममध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन पेटले असून, अनेक ठिकाणी हजारो नागरिक रस्त्यावर उतरून आपला विरोध प्रदर्शित करत आहेत. 

आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संतप्त आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या पुतळ्यांचे अनेक ठिकाणी दहन केले. नागरिकत्व संशोधन विधेयकामुळे मिझो नागरिकांचे अस्तित्वच धोक्‍यात आले असल्याचा दावा करत आंदोलकांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

मिझोराममधील सर्व जिल्हा मुख्यालये आणि इतर सुमारे 50 ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या मुद्द्यावरून मिझोराममध्ये सुरू असलेल्या आंदोलनाने आता गंभीर वळण घेतले आहे. मिझो स्टुडंट फेडरेशनने (एमझेडपी) नागरिकत्व संशोधन विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी सभेचे आयोजन केले होते.

 तसेच, आठ जानेवारी रोजी या संघटनेने अकरा तासांच्या मिझोराम बंदची ही हाक दिली होती. या विधेयकामुळे मिझो नागरिकांचे समूळ उच्चाटन होईल, असा आरोप "एमझेडपी'कडून करण्यात येत आहे. 

नागरिकत्व संशोधन विधेयकाला आठ जानेवारी रोजी लोकसभेने मंजुरी दिली असून, या विधेयकाद्वारे बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील बिगर मुस्लिम नागरिकांना विनाअट भारतीय नागरिकत्व प्रदान केले जाणार आहे. ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये या विधेयकाला विरोध करण्यात येत आहे. 
---  

संबंधित लेख