cidco fire briged | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

... तर अग्निशमन दलाच्या जवानांना शहीदाचा दर्जा

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 मे 2017

मुंबई : सिडको महामंडळातर्फे सिडको अग्निशमन दलातील जवानांचा कर्तव्य बजावत असताताना मृत्यू झाल्यास त्यांना शहीदांचा दर्जा देण्याचा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला आहे. 

मुंबई : सिडको महामंडळातर्फे सिडको अग्निशमन दलातील जवानांचा कर्तव्य बजावत असताताना मृत्यू झाल्यास त्यांना शहीदांचा दर्जा देण्याचा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला आहे. 

सिडको महामंडळार्तंगत द्रोणागिरी, खारघर, नवीन पनवेल आणि कळंबोली हे चार अग्निशमन केंद्रे व उलवे येथील नव्याने स्थापित करण्यात आलेल्या केंद्राचा समावेश आहे. सिडकोच्या 23 फेब्रुवारी 2017 रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अग्निशमनचे जवान स्वत:च्या प्राणांची बाजी लावून आपत्कालिन परिस्थितीमध्ये नागरिकांचे व संपत्तीचे रक्षण करतात. काहीवेळा कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू होतो. 

या योजनेर्तंगत शहिद झालेल्या अग्निशमन जवानांच्या कुटुंबाच्या उज्जवल भविष्यासाठी सोयी- सुविधा सिडकोमार्फत पुरविण्यात येतील. अग्निशमन दलातील वीरमरण प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शहिदांचा दर्जा देणारे सिडको महामंडळ हे देशातील पहिले महामंडळ आहे. अग्निशमन दलाचे कार्य पाहता कोणत्याही क्षणी त्यांना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशा वेळेस कर्मचारी जखमी झाल्यास त्यांना तत्काळ उत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी व त्यांच्यावर योग्य उपचार व्हावे यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांना 20 लाखांपर्यंतच्या अपघाती विम्याचे कवच असेल.  

 
 

संबंधित लेख