cidco | Sarkarnama

अतिक्रमणावर तोडगा काढताना सिडकोने भूखंडच काढला विक्रीला

संदीप खांडगेपाटील : सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 एप्रिल 2017

पनवेल : खांदा कॉलनीतील कोट्यवधी रुपये किमतीच्या भूखंडावर अतिक्रमण विरोधी कारवाई करूनही झोपडपट्टीधारक पुन्हा पुन्हा त्या भूखंडावर अतिक्रमण करत आहे. या अतिक्रमणांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी खांदा कॉलनी सेक्‍टर 11 येथील संबंधित भूखंडाच्या विक्रीकरात सिडकोने निविदाच काढली आहे. 

पनवेल : खांदा कॉलनीतील कोट्यवधी रुपये किमतीच्या भूखंडावर अतिक्रमण विरोधी कारवाई करूनही झोपडपट्टीधारक पुन्हा पुन्हा त्या भूखंडावर अतिक्रमण करत आहे. या अतिक्रमणांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी खांदा कॉलनी सेक्‍टर 11 येथील संबंधित भूखंडाच्या विक्रीकरात सिडकोने निविदाच काढली आहे. 

खांदा कॉलनी येथील बेकायदा झोपडपट्टीला लगाम घालण्यात संघर्ष समितीला यश आल्यानंतर काही राजकीय नेत्यांनी मतांसाठी आश्रय दिल्याने पुन्हा झोपड्या वसविण्यात येत आहेत. याबाबत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्याकडे संघर्ष समितीने कैफियत मांडून त्या झोपड्या हटविण्याची मागणी केली होती. गगराणी यांनी थेट त्या भुखंडांच्या विक्रीसाठी निविदा काढल्याने आता झोपडपट्टीचे मूळच उखडून टाकले जाणार आहे. 

खांदा कॉलनी येथील सिडकोच्या मोक्‍याच्या भूखंडावर मतांसाठी राजकीय नेत्यांनी झोपड्या बांधून त्या विकल्या होत्या. काहींनी तर भाड्याने देण्याचा गोरख धंदा सुरू केला होता. दरम्यान, झोपड्यांमधून सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे तेथील नागरिक प्रचंड संताप व्यक्त करीत होते. त्यांनी वारंवार सिडकोशी पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांच्या निवेदनांना केराची टोपली दाखविण्यात आली होती. एका लोकप्रतिनिधीनेही दोन वर्षे नागरिकांना आश्‍वासनांव्यतिरिक्त काहीच दिले नाही. 

अखेर काही नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते कांतिलाल कडू यांची भेट घेऊन कैफियत मांडली. पावसाळा वगळता अवघ्या दोनच महिन्यात कारवाई करण्यास सिडकोला संघर्ष समितीने प्रवृत्त केले. त्यानंतर काही दिवसात पुन्हा तिथे झोपड्या वटविण्यास राजकीय आश्रय दिला आहे. महापालिका निवडणुका झाल्या की, पक्‍क्‍या झोपड्या बांधून देण्याचे गाजरही स्थानिक राजकीय नेत्यांनी झोपडपट्टीवासीयांना दाखविल्याने मोठ्या प्रमाणात पुन्हा झोपड्या उभ्या राहत आहेत. याबाबत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्याकडे संघर्षाचे अध्यक्ष कांतिलाल कडू यांनी मागणी करत झोपड्यांवर तत्काळ कारवाई व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. 

गगराणी येथील सेक्‍टर 11 (डब्लू) येथील 21 ते 23 हे तीन भूखंड अनुक्रमे 4 (एक) आणि सहा हजार स्वेअर फुटाचे दोन भूखंड 42, 620 रुपये स्वेअर मीटरप्रमाणे तसेच अन्य तीन असे मिळून सहा भूखंड गृहनिर्माण सोसायटी आणि 8400 मीटरचा र्थी, फोर स्टार हॉटेलसाठी भुखंड आरक्षित करून त्यांची शनिवारी (दि. 29 एप्रिल) निविदा प्रकाशित केली आहे. 

पनवेल महानगरपालिकेची पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल 26 मे रोजी लागणार असून योगायोगाने त्याच दिवशी या भूखंडांच्या विक्रीकरात निविदा उघडण्यात येणार आहे. या भूखंड विक्रीमुळे सिडकोला करोडो रुपये मिळतील, झोपड्या अतिक्रमणापासून परिसराचा बकालपणा संपुष्टात येणार असल्याचे समाधान स्थानिक परिसरातील रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

संबंधित लेख