Chitra wagh takes tawde to task on Ram Kadam issue | Sarkarnama

कदमांवर कारवाईसाठी विनोद तावडेंवर चित्रा वाघांचा प्रश्नांचा भडीमार 

सरकारनामा
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

सेच पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनाही अडवून त्यांना जाब विचारला. त्यांना केवळ आरक्षणावर भांडू नका, महिलांच्या विषयावर ही बोला. मांडीला मांडी लावून तिथे बसता आणि महिलांवर होणाऱ्या अन्यायाबाबत काहीही बोलत नाही, अशी प्रश्‍नांची सरबत्ती चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर केली. 

सातारा : आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करून राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना अडवून जाब विचारला. यावेळी महिलांनी श्री. कदमांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली. तर मंत्री तावडेंनी तुमच्या भावना आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू अशी ग्वाही दिली. 

तर मी मुलगी पळवून आणण्यास मदत करेन, असे वक्तव्य भाजप आमदार राम कदम यांनी काल केले होते. या वक्तव्याचा फटका आज शिक्षक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त साताऱ्यातील विश्रामगृहात आलेले मंत्री विनोद तावडे यांना बसला. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखालील महिलांनी मंत्री विनोद तावडे यांना विश्रामगृहात गाठले. तेथे श्री. तावडे यांना घेराव घालून राम कदमांच्या वक्तव्याचा जाब विचारला.

 यावेळी श्री. तावडेंवर चित्रा वाघ यांनी प्रश्‍नांचा भडीमार केला. यावर मंत्री तावडेंनी आम्ही तुमचा निरोप मुख्यमंत्र्यांना देतो, अशी ग्वाही दिली. मुख्यमंत्र्यांना निरोप देतो म्हणून मखलाशी करू नका राम कदमांवर काय कारवाई करणार याचे उत्तर द्या? अशा शब्दात जाब विचारला. तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनाही अडवून त्यांना जाब विचारला. त्यांना केवळ आरक्षणावर भांडू नका, महिलांच्या विषयावर ही बोला. मांडीला मांडी लावून तिथे बसता आणि महिलांवर होणाऱ्या अन्यायाबाबत काहीही बोलत नाही, अशी प्रश्‍नांची सरबत्ती चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर केली. 

राम कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन 
हाकलून द्या हाकलून द्या...राम कदमला हाकलून द्या, राम कदमचे करायचे काय खाली मुंडी वर पाय..., भाजप सरकार हाय हाय, अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवनासमोर आमदार राम कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. हा राम नसून मुजोरी राम आहे..अशी टिका चित्रा वाघ यांनी केली. 

यावेळी जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, जयश्री पाटील, नलिनी जाधव, कुसुमताई भोसले, डॉ. सुनिता शिंदे, सुवर्णा पवार, सीमा जाधव, कल्पना जवळ, सुरेखा निवडुंगे पाटील, सुजाता घोरपडे, सीमा गायकवाड, स्मिता देशमुख, उषा जाधव, नंदीनी जगताप, जयश्री साळुंखे, आदी उपस्थित होत्या. 
 

संबंधित लेख