Chitra Wagh on railway condition | Sarkarnama

रेल्वेमंत्र्याच्या बुद्धीला गंज चढलाय - चित्रा वाघ 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

मुंबईत एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेला 25 दिवसांचा कालावधी उलटून गेला असला तरी, अद्यापही रेल्वे प्रशासनाने कोणतीही सुधारणा आणि उपाययोजना करायला सुरुवात केली नाही. दुसरीकडे मुंबईच्या लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आकस्मिक प्रसंगी रेल्वेतील साखळी गंज चढल्याने खेचली जात नाही. असाच गंज देशाच्या रेल्वे मंत्र्याच्या बुद्धीलाही चढला असल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. 

मुंबई : मुंबईत एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेला 25 दिवसांचा कालावधी उलटून गेला असला तरी, अद्यापही रेल्वे प्रशासनाने कोणतीही सुधारणा आणि उपाययोजना करायला सुरुवात केली नाही. दुसरीकडे मुंबईच्या लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आकस्मिक प्रसंगी रेल्वेतील साखळी गंज चढल्याने खेचली जात नाही. असाच गंज देशाच्या रेल्वे मंत्र्याच्या बुद्धीलाही चढला असल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. 

वाघ यांनी आज पुन्हा ज्या एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर दुर्घटना झाली होती, त्या-त्या ठिकाणची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या की, एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत 23 जणांचा बळी घेऊनही केंद्रीय रेल्वेमंत्र्याचे डोळे उघडले नाहीत. यामुळे या मोठ्या दुर्घटनेनंतरही रेल्वे प्रशासन ढिम्म असल्याची टीका त्यांनी केली. 

रेल्वेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला असून त्याकडेही रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही. मुंबईत काल एका मुलीने आपल्या डब्ब्यात पुरुष आला असल्याने रेल्वेची साखळी ओढली, परंतु त्याला गंज लागल्याने रेल्वे थांबू शकली नाही. यामुळे रेल्वेसोबतच रेल्वे मंत्र्याच्या बुद्धीला गंज चढला असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला. 

संबंधित लेख