Chiplun news - Sadanand-Chavan-Birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : सदानंद चव्हाण, आमदार, चिपळूण 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

शिवसैनिकांचा विश्‍वास आहे तोवर आमदार मीच, असे ते छाती ठोकून सांगतात, एवढा त्यांना त्यांच्या कामाबद्दल विश्‍वास आहे. 

भास्कर जाधव यांनी शिवसेना सोडल्याचा बसलेला तडाखा. त्यांच्यासोबत गेलेला कार्यकर्ता व त्यामुळे शिवसेनेला चिपळुणात आलेले वाईट दिवस या पार्श्‍वभूमीवर सदानंद चव्हाण चिपळुणात आले. फक्त आले नाहीत तर शिवसेनेची भक्कम बांधणी केली. त्यामुळे गेली आठ वर्षे संगमेश्‍वर-चिपळूण अशा एकत्र झालेल्या मतदारसंघात ते आमदार आहेत. 

मितभाषी आणि केलेल्या कामाचा डांगोरा न पिटता चाललेली वाटचाल, ही त्यांची वैशिष्ट्ये ठरतात. शिवसेनेची ओळख मानली गेलेली आक्रमकता त्यांच्या वागण्या बोलण्यात अभावानेच दिसते. विधीमंडळात मतदारसंघातील प्रश्‍न नेमकेपणाने मांडून विकास कामे करण्याची त्यांची खासीयत आहे. वाढीव मतदारसंघावरही त्यांची मजबूत पकड आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चिपळुणमध्ये शिवसेना पुन्हा रुजली आहे. शिवसैनिकांचा विश्‍वास आहे तोवर आमदार मीच, असे ते छाती ठोकून सांगतात, एवढा त्यांना त्यांच्या कामाबद्दल विश्‍वास आहे. 
 

संबंधित लेख