chipi airport starts | Sarkarnama

जगात पहिल्यांदाच विमानतळाची सुरवात गणपती बाप्पाच्या साक्षीने! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

चिपी विमानतळाचा समावेश उडान योजनेत झाला आहे.

चिपी (सिंधुदुर्ग): विमानतळ मंजूर होवून सतरा वर्षे झाली तरी अपत्य होत नव्हते. अखेर सिझेरीयन करुन जन्म देण्याचे काम पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले, अशी टिका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर त्यांचे नाव न घेता खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी आज केली. 

येथे झालेल्या विमानतळ उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. सावंतवाडीत येथे झालेल्या सभेत विमानतळ जिल्ह्यात मीच आणले. त्यामुळे माझ्या अपत्याला मीच का विरोध करू, असा प्रतिप्रश्‍न माजी मुख्यमंत्री राणे यांनी केला होता. त्याने पालकमंत्र्यांवरही आरोप केले होते. या पार्श्‍वभूमिवर आज चिपी विमानतळावर पहिले विमान दाखल झाले.

याच्या उद्घाटन कार्यक्रमात श्री. राऊत म्हणाले, अखेर सिझेरीयन करून या अपत्याला जन्म देण्याचे काम पालकमंत्री केसरकर यांनी केले. विशेष म्हणजे जगात पहिल्यांदाच विमानतळाची सुरवात गणपती बाप्पाच्या साक्षीने झाली. ही सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यामुळे आता जिल्ह्याचा विकास निश्‍चित होणार आहे. या विमानतळाचा समावेश उडान योजनेत झाला आहे. त्यामुळे याचा सर्वसामान्यांना फायदा होईल. 

संबंधित लेख