chindam wins as independent | Sarkarnama

छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम विजयी; पत्नी पराभूत

मुरलीधऱ कराळे
सोमवार, 10 डिसेंबर 2018

नगर : छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम नगर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग ९ (क) मूधन सर्वसाधारण जागेवर अपक्ष म्हणून विजयी झाला आहे. 

पहिला चार फेऱ्यांमध्ये मनसेच्या पोपट पाथरे यांनी आघाडी घेतली होती. सहाव्या फेरीत मात्र छिंदम याने आघाडी घेतली.या प्रभागात छिंदम याच्या विरोधात अनिता राठोड (राष्ट्रवादी), सुरेश तिवारी (सेना), प्रदीप परदेशी (भाजप) तसेच इतर उमेदवार  निवडणुकीच्या रिंगणात होते़.

या मतदारसंघात चार फेऱ्यायांनंतर मनसेचे पोपट पाथरे यांनी पाचशे मतांची आघाडी घेतली होती़ मात्र, नंतर सहाव्या फेरीनंतर छिंदमने चारशे मतांची आघाडी घेतली़ त्याची ही आघाडी तेराव्या फेरीनंतर १८५० मतांपर्यंत पोहोली आहे़ या प्रभागात छिंदमविरोधात अनिता राजेंद्र राठोड (राष्टÑवादी), सुरेश रतनप्रसाद तिवारी (सेना), प्रदीप परदेशी (भाजप), पोपट भानुदास पाथरे (मनसे), प्रवीण शाहूराज जोशी (अपक्ष), निलेश सत्यवान म्हसे (अपक्ष), अजयकुमार अरुण लयचेट्टी (अपक्ष) हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़

श्रीपाद छिंदमची पत्नी स्नेहा या प्रभाग १३ (क) मधून निवडणूक लढवत होत्या़ त्यांच्याविरोधात निलम गजेंद्र दांगट (राष्ट्रवादी) गायत्री नरेंद्र कुलकर्णी (भाजप), सुवर्णा संजय गेनाप्पा (शिवसेना), सुनीता शांताराम राऊत हे रिंगणात होते़ येथे शिवसेनेच्या गेनाप्पा विजयी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित लेख