Child loses life because of doctor"s strike | Sarkarnama

डॉक्‍टरांचा संप चिमूकल्याच्या जीवावर बेतला 

सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 24 मार्च 2017


माता बालक या बोरीवलीतील रूग्णालयात अत्याधुनिक सोई-सुविधा अद्याप पुरविण्यात आल्या नाहीत. या रूग्णालयाचे काम सुरू असल्याने सुविधांचा अभाव आहे. मात्र संबधित प्रकरणात मुलांवर उपचार का झाले नाही याचा आढावा घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. 
डॉ. अविनाश सुपे- अधिष्ठाता, केईएम रूग्णालय. 

मुंबई :  आपल्या हक्काच्या मागण्यासाठी डॉक्‍टरांनी पुकारलेल्या संप तीन वर्षाच्या चिमूकल्याच्या जीवावर बेतला आहे. वेळीच उपचार न मिळाल्याने बोरीवली येथील स्वर्ण फाटक या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

मागील महिन्यात नायर रूग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या या चिमुकल्याला अचनाक श्‍वसनाचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे जवळच्या महापालिकेच्या रूग्णालयात पालकांनी धाव घेतली. मात्र डॉक्‍टरांच्या संपामुळे आणि आपुऱ्या सोई सुविधांमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने स्वर्ण फाटकला आपला जीव गमवावा लागला आहे. 

मुंबईतील बोरीवली येथील देवी पाडा परिसरात फाटक कुटुब राहते. नाक आणि हिरडी यामध्ये पोकळी असल्याने मागील महिन्यात स्वर्ण फाटक याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र 23 तारखेला सकाळी छातीत कफ झाल्याने स्वर्णला श्‍वसनाचा त्रास सुरू झाला. म्हणून नातेवाईक लगेचच जवळच्या माता बालक रूग्णालयात त्याला घेऊन गेले. पण डॉक्‍टरांच्या सुरू असलेल्या संपामुळे आणि रूग्णालयातील अपुऱ्या सोई सुविधांमुळे डॉक्‍टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला.

त्यामुळे घाबरलेल्या फाटक कुंटुंबियांनी स्वर्णला घेऊन तात्काळ खासगी रूग्णालय गाठले. मात्र त्याठिकाणीही संपाचे कारण सांगण्यात आले. कुठेच उपचार होत नसल्याने फाटक कुटुबियांनी नायर रूग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. पण या सर्व प्रकरात जवळपास तीन दान ते आडीज तास उलटले होते. आणि नायरकडे जाण्यास निघणार तेवढ्यात तीन वर्षाच्या स्वर्णने अखेरचा श्‍वास घेतल्याचे स्वर्णच्या नातेवाईकांनी सांगितले. 

 

टॅग्स

संबंधित लेख