child harassament discuss in parliment | Sarkarnama

बालगृहातील लैगिंक शोषण संसदेत विरोधक आक्रमक 

वृत्तसंस्था
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : लोकसभेत आज बिहारच्या मुझफ्फरपूर येथील बालगृहातील लैगिंक शोषण प्रकरणाचे पडसाद उमटले. विरोधकांचा गोंधळ आणि सभात्यागामुळे कामकाजावर परिणाम झाला. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी महिला आणि मुलींवरील अत्याचार कदापि सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत याप्रकरणाची चौकशी योग्य देखरेखीखाली करावी, असा आग्रह बिहार सरकारला केला. 

दरम्यान, या प्रकरणाचे पुरावे नष्ट केले जात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे खासदार रणजित रंजन यांनी केला. 

शून्यप्रहरात कॉंग्रेसचे रणजित रंजन आणि राजदचे जयप्रकाश नारायण यादव यांनी मुझफ्फरपूरच्या बालिका लैगिंक शोषणाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटासाठी साडेबारा वाजेपर्यंत स्थगित केले. सभागृहाचे कामकाज स्थगित होण्यापूर्वी गृहमंत्री राजनाथसिंह सभागृहात होते. मात्र गोंधळामुळे कामकाज स्थगित झाल्याने ते सभागृहाबाहेर गेले. 

कामकाज सुरू झाल्यानंतर कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, मुझफ्फरपूरचा विषय मांडला जात असताना गृहमंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित होते. मात्र यावर लोकसभा अध्यक्षांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू असून ते काय उत्तर देणार, असे सांगितले. 

यापूर्वीही त्यांनी मत मांडले आहे. शून्यप्रहरात दररोज उत्तर दिले जात नाही, असे त्या म्हणाल्या. हा विषय केवळ बिहारपुरतीच मर्यादित नसून सर्वांचा असल्याचे नमूद केले. महिला आणि मुलींवरील अत्याचार कोणीही सहन करणार नाही. सरकारने देखील याप्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. सीबीआय चौकशी योग्य तऱ्हेने आणि देखरेखीखाली व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख