chikatgaonkar mla | Sarkarnama

विधानसभा अध्यक्षांच्या सचिवांकडे चिकटगांवकरांचा राजीनामा सुपूर्द

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 जुलै 2018

औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रसचे वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांचा राजीनामा मिळाला नसल्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गुरूवारी (ता.26) स्पष्ट केले होते. त्यानंतर ही स्टंटबाजी तर नाही ना ? अशा शंका उपस्थित केल्या जात होत्या. या पार्श्‍वभूमीवर आमदार चिकटगांवकर यांनी आज मुंबईला जाऊन आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे सचिव राजकुमार सागर यांच्याकडे सुर्पूद करत उलटसुलट चर्चेला पूर्णविराम दिला. 

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा अशी मागणी करत शिवसेनेचे कन्नड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला होता. आधी ईमेलवर आणि दुसऱ्या दिवशी मुंबईत प्रत्यक्ष जाऊन विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयीन अध्यक्षांकडे राजीनामा सुर्पूद केला होता. हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा पत्र मेल केल्यानंतर तासाभरातच वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर यांनी देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. तसे पत्र देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. 

जिल्ह्यातील दोन आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यावर काय कारवाई होणार या संदर्भात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यांशी संपर्क साधला तेव्हा आपल्याकडे केवळ हर्षवर्धन जाधव यांचाच राजीनामा आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. शिवाय मेलवरही त्यांचा राजीनामा मिळाला नसल्याचे सांगितले. 

त्यामुळे चिकटगांवकर यांच्या राजीनाम्या विषयी अनेक शंकाकुशंका उपस्थित केल्या गेल्या. अनेकांनी थेट भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्याकडे देखील विचारणा केली. राजीनाम्याची ही स्टंटबाजी तर नाही ना? अशा चर्चा देखील जिल्ह्यात सुरू झाल्या होत्या. अखेर आज मुंबई गाठत चिकटगांवकर यांनी आपला राजीनामा विधानभवनात जाऊन अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर यांच्याकडे सोपवला आहे. 

संबंधित लेख