chief secretery retirement issue | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांना मुदतवाढ द्यावी की न द्यावी?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 डिसेंबर 2018

अजोय मेहता, यू. पी. एस. मदान यांची मुख्य सचिवपदाची संधी हुकण्याची शक्‍यता आहे.

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत असून, त्यांना मुदतवाढ द्यावी किंवा नाही याबाबत राज्य सरकारसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. 

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर जैन यांना मुदतवाढ दिल्यास मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यू. पी. एस. मदान यांची मुख्य सचिवपदाची संधी हुकण्याची शक्‍यता आहे. हे दोघेही पुढील वर्षी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे जैन यांच्या मुदतवाढीबाबत संभ्रमाची स्थिती आहे.

दिनेशकुमार जैन 31 जानेवारी 2019 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि आगामी लोकसभा निवडणुका यामुळे जैन यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाण्याची शक्‍यता आहे. मुदतवाढ मिळावी यासाठी स्वत: जैन हे प्रयत्नशील असल्याचे समजते. मात्र, त्यांना मुदतवाढ दिल्यास मुख्य सचिवपदाच्या शर्यतीत असलेल्या अजोय मेहता आणि यू. पी. एस. मदान यांना मुख्य सचिव म्हणून कमी कालावधी मिळणार आहे. 

गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल येत्या 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. पोरवाल यांच्या जागी कोणाची नियुक्ती होते, यावर मुख्य सचिव कोण हे ठरणार आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून मेहता आणि मदान या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. गृह विभागाचे प्रशासकीय प्रमुख म्हणून मदान यांची नेमणूक झाल्यास मुख्य सचिवपदी मेहतांची वर्णी लागू शकते. मुंबई महापालिकेचे आयुक्त असलेले मेहता हे मुख्यमंत्र्यांच्या विशेष मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जातात. 

संबंधित लेख