chief minister assures Ramdas Athavale | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उद्धव ठाकरेंनी उद्या 288 विधानसभा क्षेत्राच्या संपर्कप्रमुखांची बोलावली तातडीने बैठक
धनगर आरक्षणासाठी विधान भवनाच्या गेटवर यशवंत सेनेच आंदोलन

इंदूमिलस्थळी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे  प्रत्यक्ष काम 14 एप्रिलपर्यंत सुरु होणार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 मार्च 2017

मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांचे  केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांना आश्वासन

मुंबई :   महामानव डॉ बाबासाहेब  आंबेडकर  स्मारकाच्या प्रत्यक्ष  कामास 14 एप्रिल पूर्वी प्रारंभ करावा त्यासाठी आवश्यक असणारे सर्व तांत्रिक अडचणी सोडवून  आवश्यक  परवानगी मिळवाव्यात या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली .

यावेळी  झालेल्या  चर्चेत मुख्यमंत्र्यांनी इंदूमिल स्थळी तोडकाम सुरु असून तेथे काम करण्यास  कोणत्याही प्राधिकरणाने मनाई केलेली नाही स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी आवश्यक त्या सर्व विभागाच्या परवानगी घेतल्या असून महापालिकेचेही आवश्यक पत्र  लवकरच मिळेल . त्यामुळे येत्या 14 एप्रिल भीमजयंती पर्यंत  इंदूमिळस्थळी  प्रत्यक्ष स्मारक काम सुरु  करण्यात  येईल असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिले.
रामदास आठवले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात रिपाइं चे राजा सरवदे ; काका खांबाळकर , एस एस यादव , एम एस नंदा , विठ्ठल पाटील , चंद्रशेखर कांबळे , भीमराव सवातकर, हेमंत रणपिसे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते

संबंधित लेख