chieaf minister | Sarkarnama

"त्या' आवाजाने केली  मुख्यमंत्र्यांची बोलती बंद ! 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 1 जून 2017

मुंबई ः शेतकऱ्यांना खरिप हंगामासोबतच पीक कर्जासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या योजनेची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र या पत्रकार परिषदेत लावण्यात आलेल्या कॅमेरा अथवा इतर कोणत्या तरी वस्तूच्या आवाजाने मुख्यमंत्र्यांची अनेकदा बोलती बंद केली. 

कुठून आवाज येतोय याची माहिती घेण्यासाठी ते बोलताना दोनतीनदा मध्येच थांबले.ऐरवी विरोधकांकाची बोलती बंद करणारे मुख्यमंत्री आपल्याच अतिथीगृहातील लहानशा आवाजाने बैचेन झाल्याचे चित्र आज पहावयास मिळाले. दरम्यान, हा आवाज सुरू असताना मध्येच एका दरवाज्यातून येणाऱ्या वाऱ्याच्या आवाजानेही ते पुन्हा बेचैन झाले. शेवटी त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दरवाज्याबाहेरून सुरू असलेला आवाज थांबवा, अशा सूचना दिल्या.मात्र कर्मचाऱ्यांकडून हा आवाज वाऱ्याचा येत असल्याचे सांगण्यात आले. तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी आपली बैचनी हसण्यावर नेवून पत्रकार परिषद पुढे सुरू ठेवली. 

संबंधित लेख