मोदी सरकारकडून सर्वसामान्यांची लूट : पी. चिदंबरम

मोदी सरकारकडून सर्वसामान्यांची लूट : पी. चिदंबरम

ठाणे : मोदी सरकार सर्वसामान्यांची केवळ लूट करत आहे, अशी टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने "फूट पाडणारे राजकारण, मंदावलेली अर्थव्यवस्था' या विषयावर डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात चर्चासत्र झाले. त्यामध्ये चिदंबरम बोलत होते. या कार्यक्रमालाखासदार अशोक चव्हाण आणि खासदार कुमार केतकर उपस्थित होते.

चिदंबरम म्हणाले, की मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. या सरकारचा प्रत्येक निर्णय चुकीचा ठरत आहे. 2014 ला कच्च्या तेलाची किंमत 105 डॉलर प्रतिबॅरल होती. तेव्हा देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते. सध्या 78 डॉलर प्रतिबॅरल कच्चे तेल असताना हे दर वाढतच आहेत.

 नोटाबंदीनंतर अनेक छोटे व्यावासायिक अडचणीत आले आहेत. नवे व्यवसायही निर्माण होत नसून रोजगारही घटले आहेत. दहशतवादाला आळा घालण्यासाठी आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी केल्याचे सांगण्यात आले; मात्र आताही बनावट नोटा सापडत आहेत. नोटाबंदीचा निर्णय पूर्ण फसला आहे असे चिदंबरम म्हणाले.  

दरम्यान, गुजरात निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा अस्वस्थ आहेत. मोदी केव्हा जातात, अशीच भाजप खासदारांची भावना आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचे 150 खासदारच निवडून येतील, असा दावा ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांनी केला.

जीएसटी नव्हे, गब्बर सिंग टॅक्‍स
वस्तू आणि सेवा कर या कराची संकल्पना देशात सर्वप्रथम कॉंग्रेसने आणली. तेव्हा भाजपने त्याला विरोध केला होता. त्यानंतर नरेंद्र मोदी त्याचे श्रेय घेत आहेत; मात्र मोदी सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे जीएसटीचे आता "गब्बर सिंग टॅक्‍स' झालेला आहे, असे चिदंबरम म्हणाले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com