शिवप्रेमींकडून हल्ला होण्याच्या भीतीने पोलिसांनी छिंदमला गुपचूप नाशिकला हलविले 

शिवप्रेमींकडून हल्ला होण्याच्या भीतीने पोलिसांनी छिंदमला गुपचूप नाशिकला हलविले 

नगर : श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपने हकालपट्टी केलेल्या उपमहापौर श्रीपाद छिंदम याला पुण्यातील येरवडा कारागृहाऐवजी नाशिक कारागृहात हलविण्यात आले आहे. छिंदमविरोधात लोकांचा संताप पाहता, त्याला गुप्तपणे पुण्या ऐवजी नाशिकमधील कारागृहात डांबण्यात आले आहे.छिंदमवर संपूण महाराष्ट्र खवळला असून त्याच्यावर पोलिसांसमोर हल्ला होण्याची भीती पोलिंसांना होती. 

प्रथम छिंदमला येरवडा कारागृहात हलविले जात असल्याचे सांगितले मात्र, गाडी ऐनवेळी नाशिककडे वळविली. आता छिंदमला नाशिकमधील कारागृहात ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

छिंदम हा नगर महापालिकेत भाजपचा नगरसेवक व उपमहापौर होता. त्याने शिवाजी महाराजांविषयी लांच्छंनास्पद विधान केल्याने त्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. श्रीपाद छिंदम याला न्यायालयाने शनिवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कायदा व सुव्यवस्थेचा विचार करत पोलिसांनी छिंदमला गोपनीय पध्दतीने सकाळी 8 वाजताच न्यायालयात हजर केले. त्यानंतर 9 च्या सुमारास त्याची रवानगी सबजेलमध्ये करण्यात आली. नंतर रात्री नगर उपकारागृहातून छिंदमला बाहेर काढताना उपकारागृहाच्या परिसरातील लाईट्‌स बंद करण्यात आल्या होत्या. कुणालाही कळू न देता छिंदमला नाशिक कारागृहात नेण्यात आले. 

छिंदमला सबजेलमध्ये आणताच तेथील कैद्यांनाही शिवाजी महाराजांबद्दल केलेले विधान सहन झाले नाही. संतप्त कैद्यांनी त्याला तुरूंगातच तुडविले होते. तसेच त्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, तुरूंग अधिकारी शामकांत शेडगे यांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केले. 

दरम्यान, छिंदम याचा आजही निषेध सुरूच असून त्याला कठोर शासन करण्याची मागणी होत आहे. छिंदम हा विकृत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटत आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com