विधानभवनच्या कँटिनमध्ये उसळीमध्ये चिकनचे तुकडे

विधानभवनाच्या कँटिनमध्ये वाढण्यात आलेल्या मटकीच्या उसळीमध्ये चिकनचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सहकार विभागात कार्यरत असणारे मनोज लाखे यांनी विधानसभा सचीव जितेंद्र भोळे यांच्याकडे तक्रार केली आहे.
विधानभवनच्या कँटिनमध्ये उसळीमध्ये चिकनचे तुकडे

मुंबई : विधानभवनाच्या कँटिनमध्ये वाढण्यात आलेल्या मटकीच्या उसळीमध्ये चिकनचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सहकार विभागात कार्यरत असणारे मनोज लाखे यांनी विधानसभा सचीव जितेंद्र भोळे यांच्याकडे तक्रार केली आहे.

मनोज लाखे यांना आज उसळीत चिकनचे तुकडे मिळाले. संबंधित कंत्राटदार हे निष्काळजीपणे कँटिन चालवत असून कंत्राटदारांवर सचिवांनी योग्य ती कारवाई करण्याची करावी, अशी मागणी मनोज लाखे यांनी केली आहे. मनोज लाखे हे सहकार विभागात कार्यरत आहेत. या प्रकारामुळे कँटिन कंत्राटदाराच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असा आरोप मनोज लाखे यांनी केला आहे. या कँटिनमध्ये अधिकारी, नेते, पत्रकार हे नियमितपणे जेवायला येतात. त्यामुळे या घटनेमुळे विधानभवन परीसरात एकच खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com