Chhatrapati Shivaji Maharaj Smarak in Arebian sea | Sarkarnama

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या  स्मारकाचा मार्ग मोकळा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई :  गेल्या अनेक महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम रखडले होते. या कामासाठी एल अॅंड टी या कंत्राटदार कंपनीने मोठ्या रकमेची निविदा भरली होती. आता सरतेशेवटी कंत्राटदाराने कमी रकमेत काम करण्याची तयारी दाखविली आहे.

त्यामुळे स्मारकाच्या कामातील अडथळे दूर झाले असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी दिली.

या कामासाठी एल अँड टी या कंपनीने तब्बल ३,८२६ कोटी रूपयांची निविदा भरली होती. ही निविदा मोठ्या रकमेची होती.  त्यामुळे रकम आणखी कमी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने एल अँड टीच्या अधिकाऱयांसोबत चर्चा केली. चर्चेनंतर एल अँड टीने २५०० कोटी रुपयांमध्ये (व अधिक जीएसटी) हे काम करण्याची तयारी दाखविली आहे.

त्यामुळे एल अँड टीला या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. कामाला लवकरचप्रारंभ होईल. ३६ महिन्यांमध्ये स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. हे स्मारक मुंबईच्या गिरगाव चौपाटीपासून ३.६ किलोमीटर अंतरावर उभारण्यातयेणार असल्याचे आमदार मेटे म्हणाले.

संबंधित लेख