Chhagan Bhujbal attacks central & state government | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

दिल्लीची इडा आणि महाराष्ट्रातील पीडा या दिवाळीत टळो  : छगन  भुजबळ

सरकारनामा
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

आता बळीचे राज्य येण्याची गरज आहे. कर्जमुक्तीच्या नावाने शेतकऱ्यांची दिशाभूल केली. काही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली; परंतु त्यांची तेवढीच दमछाकही केली.

-छगन भुजबळ

शहादा :  " दिल्लीची इडा आणि महाराष्ट्रातील पीडा या दिवाळीत टळो, राज्यात शेतकऱ्यांचे राज्य येवो, अशा दीपावलीच्या शुभेच्छा देत देशाच्या, महिलांच्या, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी लढाई लढण्याची वेळ आली आहे. ही लढाई परिवर्तनाची असून, त्यासाठी मनुवादी सरकारला खाली खेचण्यासाठी जाणीवपूर्वक मतदान करून बळिराजाचे राज्य आणावे,"असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री  छगन भुजबळ यांनी आज येथे केले.

 येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात समता परिषदेच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी मेळाव्यात भुजबळ यांच्या हस्ते मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.

भुजबळ म्हणाले, " मनुस्मृतीने माणुसकीच्या हक्कापासून लांब ठेवले. आता मात्र हक्कासाठी संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे. सरकार चुकले की आम्ही बोलणारच, सरकारला चुकीचे काम करू देणार नाही. एकटा आहे म्हणून संघर्षासाठी घाबरू नका, तुम्ही लढायला उभे राहा, तुमच्यामागे लोक आपोआप उभे राहतील. लढाई आता परिवर्तनाची आहे, मनुवाद्यांच्या पावलावर पाऊल हे सरकार टाकत आहे."

"  आरक्षण काढण्याचे काम सुरू आहे. शिष्यवृत्ती बंद करून गरीब विद्यार्थ्यांना अडचणीत आणले आहे. नोटाबंदी करून काळा पैसा बाहेर काढणार असे सांगितले, कुठे आला काळा पैसा? आहे तीच परिस्थिती आहे. नोटाबंदीने बेरोजगारी वाढली. शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. सहकार, शेतकरी, व्यापारी मोडून काढण्याचे काम सरकार करीत आहे. सरकारच्या सर्वच योजना अपयशी ठरत चालल्या आहेत", अशी टीकाही त्यांनी केली .

संबंधित लेख