chetan tupe appointed as pune ncp chief | Sarkarnama

चेतन तुपे यांची राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे यांची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. विद्यमान शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या जागी कोणाला नेमणार, याची गेले अनेक दिवस चर्चा होती. त्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला.

तुपे हे पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते आहे. शहराध्यक्ष आणि विरोधी पक्षनेतेपद अशा दोन्हींचा पदभार त्यांच्याकडे राहणार का, याची आता उत्सुकता आहे. स्वतः तुपे हे विरोधी पक्षनेतेपद सोडण्यास फार इच्छुक नव्हते. त्यामुळे या पदाबाबत नेते काय निर्णय घेणार, यावर आता पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष  लागले आहे.

चेतन तुपे यांचे वडील स्वर्गीय विठ्ठल तुपे हे पुण्याचे खासदार होते. तसेच त्यांनी पुणे कॅन्टोन्मेंट या विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. तुपे हे पाटील घराणे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पुण्याच्या राष्ट्रवादीची जबाबदारी आता पाटलांकडे आली, असे म्हणायला हरकत नाही.

तुपे हे हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद, पुन्हा राष्ट्रवादीची शहराची जबाबदारी आणि हडपसर विधानसभेची तयारी, या तिन्हींचा मेळ ते कसा घालणार, याचीही उत्सुकता आहे.

वंदना चव्हाण या तब्बल नऊ वर्षे शहराध्यक्षा होत्या. त्यांच्या कारकिर्दीत पक्ष वाढला. तसेच पुणे पालिकेत सत्तेवरही आला होता. आता तो विरोधी पक्षात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची बांधणी करण्याची जबाबदारी तुपे यांच्यावर असणार आहे.  

संबंधित लेख