chetan tupe and mla election | Sarkarnama

चेतन तुपे शहराध्यक्ष झाले; हडपसरमधून आमदार होणार का ?

उमेश घोंगडे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे : महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्या गळ्यात शहर राष्ट्रवादी शहराध्यक्षपदाची माळ पडली. मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका समोर ठेऊन तुपे यांची निवड करण्यात आली आहे. तुपे यांच्या रूपाने सुमारे नऊ वर्षानंतर पक्षाचा शहराध्यक्ष बदलण्यात आला आहे. मात्र शहराध्यपदाची जबाबदारी पार पाडताना आमदार होण्याचे तुपे यांचे स्वप्न कितपत पूर्ण होणार याबाबत साशंकता व्यक्त होऊ लागली आहे. 

शहराध्यक्षपदाच्या निमित्ताने संपूर्ण शहराची जबाबदारी तुपे यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात शहरातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी त्यांना काम करावे लागणार असल्याने त्यांना हडपसरमधून मिळणाऱ्या संधीबाबत साशंकता व्यक्त होऊ लागली आहे. तुपे यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ पडताच पक्षातील त्यांचे सहकारी व या मतदासंघातून इच्छुक असलेले पदाधिकारी सुखावले आहेत. आता आपल्याला संधी मिळेल अशी अशा त्यांना वाटू लागली आहे. 

मात्र इच्छुकांची ही आशा टिकाऊ स्वरूपाची आहे, असे वाटत नाही. कारण शहराध्यक्षपद स्वीकारताना पक्षातील वरिष्ठांकडून हडपसरमधून उमेदवारीचा शब्ददेखील तुपे यांनी घेतल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघातून तुपे यांनी गेल्यावेळी निवडणूक लढविली आहे. राष्ट्रवादीचा एका अर्थाने हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तुपे जरी शहराध्यक्ष झाले तरी त्यांची हडपसरमधील उमेदवारी कायम राहील, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले. खासदार वंदना चव्हाण या नऊ वर्षे पक्षाच्या शहराध्यक्ष होत्या. आता तुपे यांच्याकडे पक्षाने मोठ्या विश्‍वासाने पक्षाने जबाबदारी सोपविली आहे. निवडणूक लागेल तेव्हा उमेदवारीबाबत जो व्हायचा तो निर्णय होईल. मात्र शहराध्यक्ष या नात्याने निवडणुकीची तयारी व पक्ष संघटनेची बांधणी या दोन्ही पातळ्यांवर तुपे यांना मेहनत करावी लागणार आहे. 
 
संबंधित लेख