chaya gore about shrigonda nagarpalika | Sarkarnama

छाया गोरे यांची श्रीगोंदे नगराध्यक्षपदासाठी गुगली

संजय आ. काटे
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

श्रीगोंदे नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक ही पैशाच्या जोरावर होईल, ही सगळ्यांची चर्चा साफ चुकीची आहे.

श्रीगोंदे (नगर) : नगराध्यक्षपदाची धुरा सव्वा दोन वर्षे नुसती समर्थपणेच सांभाळली नाही तर या कालावधीत शंभर कोटींची कामेही शहरासाठी आणली. याच जीवावर आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नक्कीच उतरेन मात्र त्यावेळच्या राजकीय परिस्थितीची वाट पाहणार असल्याची गुगली माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका छाया गोरे यांनी टाकली आहे. 

श्रीगोंदे नगरपालीका निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्याने इच्छूकांची रणनिती सुरु आहे. विद्यमान नगराध्यक्ष मनोहर पोटे हे पत्नी शुभांगी यांना मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहेत. माजी नगराध्यक्ष सुनीता शिंदे यांच्यासह डाॅ. सुवर्णा होले, अर्चना गोरे यांनीही मोट बांधली आहे. राजेंद्र नागवडे यांचे विश्वासू भीमराव आनंदकर यांच्या पत्नी उमेदवार असू शकतात, अशी चर्चा जोर धरीत आहे. 

त्यातच आता छाया गोरे यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या मैदानात उडी घेतली आहे. त्या म्हणाल्या, श्रीगोंदे नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक ही पैशाच्या जोरावर होईल, ही सगळ्यांची चर्चा साफ चुकीची आहे. श्रीगोंद्यातील लोक सुज्ञ आहेत. ते पैशाकडे नव्हे, तर विकासकामांकडे पाहतात, हा अनुभव यापुर्वीही आला आहे. आमचे नेते माजीमंत्री बबनराव पाचपुते व बाबासाहेब भोस यांनी माझ्यावर विश्वास टाकून सव्वा दोन वर्षे नगराध्यक्षपद दिले, त्या संधीचे सोने करताना माझे दीर बापुराव गोरे यांच्या व सहकारी नगरसेवकांच्या मदतीने शहराचा खरा कायापालट करण्याची सुरुवात केली.  

संबंधित लेख