chavan mp and nashik | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

खासदारपुत्र समीर चव्हाणांचे "झट मंगनी, पट शादी !'

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

नाशिक : देशात निवडणुकांची हवा आहे. लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्याचा राजकीय नेत्यांच्या कौटुंबिक सोहळ्यांवरही परिणाम झालाय. राजकारणी मंडळी पुढील वर्षाची राजकीय धामधूम लक्षात घेऊन घरातील लग्नकार्य यावर्षीच उरकून घेत आहेत. त्याचे ताडे उदाहरण म्हणजे खासदार चव्हाण यांचे.  भारतीय जनता पक्षाचे दिंडोरीचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांचा मुलगा समीरचे चार दिवसांपूर्वी लग्न ठरले. पुढच्या आठवड्यात 15 सप्टेबरला त्यांचा विवाह होईल. राजकीय धावपळीमुळे ही " चट मंगनी, पट शादी ! ' चर्चेचा विषय ठरला आहे. 

दिंडोरीचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण आणि जिल्हा परिषद सदस्या कलावती चव्हाण यांचे पुत्र समीर आणि कळवण येथील संतोष धोंडु गायकवाड यांची कन्या वैशाली यांचा विवाह येत्या 15 सप्टेबरला नाशिक येथे होणार आहे. चार दिवसांपूर्वी हा विवाह निश्‍चित झाला. दोन दिवसांपूर्वी घरगुती समारंभात साखरपुडा झाला. स्वतः समीर भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष आहे. त्याने नाशिक शहरात बी. एससी, ऍग्रीकल्चर पदवी प्राप्त केली आहे. त्याने गतवर्षी जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी केली होती. नियोजीत वधु वैशालीचे आई गृहिणी तर वडील महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स संस्थेत नोकरी करतात. वैशालीचे शिक्षण नाशिक शहरातच झाले आहे. तीने एम.ए., बी.एड. पदवी पुर्ण केली आहे. 

खासदार चव्हाणांच्या घरी सध्या लगीनघाई असल्याने आज सकाळी त्यांनी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभु यांना लग्नाचे निमंत्रण दिले. उद्या (ता.5) दुपारी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विवाहासाठी निमंत्रीत करणार आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांसह विविध राजकीय नेत्यांना निमंत्रण देता देता ते मतदारसंघातील प्रश्‍नही कानी घालत आहेत. 

संबंधित लेख