chavan and aurangabad city | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

चव्हाण मांडणार आहेत राफेलचा मुद्दा "एनजीओ'तील परिसंवादात !

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

औरंगाबाद : राज्याचे माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि गांधी कुटुंबाचे विश्‍वासू असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा राफेल आणि सीबीआय प्रकरणावरून सत्ताधारी भाजपावर हल्ला चढवण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु यावेळी राजकीय व्यासपीठावरून नाही तर एका एनजीओच्या माध्यमातून तज्ञ म्हणून ते आपली मत मांडणार आहेत. राफेल विमान खरेदी करार आणि सीबीआयमध्ये झालेल्या घडामोडी यावरून सध्या राष्ट्रीय राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधकांनी या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. 

नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकीत देखील कॉंग्रेसकडून या दोन प्रकरणांचा पुरेपूर वापर प्रचारासाठी करण्यात आला होता. त्याचा लाभ तीन राज्यात सत्ता येण्यात कॉंग्रेसला झाला. आता आगामी लोकसभा निवडणुकीत याच मुद्यावर जोर देत भाजपला खिंडीत पकडण्याची योजना कॉंग्रेसकडून राबवली जात आहे. एका एनजीओच्या माध्यमातून कॉंग्रेसशी संबंधित असलेल्या उद्योजकाने यासाठी पुढाकार घेतल्याचे बोलले जाते. येत्या रविवारी औरंगाबादेत राफेल आणि सीबीआय प्रकरणावर परिसंवाद होत आहे. यासाठी बीट्‌स पिलानी आणि कॅलिफोर्निया मधील बर्कले विद्यापीठातील उच्च विद्याविभूषीत, एरोनॉटिकल तंत्रज्ञानाचे तज्ञ आणि त्यांच्या सोबतील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. 
 
संबंधित लेख