chava and javale patil | Sarkarnama

आमदारांचे राजीनामे ही स्टंटबाजी - नानासाहेब जावळे पाटील

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 जुलै 2018

लातूर : मराठा आऱक्षणाच्या विषयावर मराठा समाजातील आमदारांकडून दिले जाणारे राजीनामे म्हणजे स्टंटबाजी आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिले जात असल्याचा आरोप छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी केला आहे. आमदारांनी ही स्टंटबाजी तातडीने बंद करावी असा इशारा देखील छावाच्या वतीने देण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. 27) पत्रकार परिषदेत बोलतांना नानासाहेब जावळे म्हणाले, राज्यात मराठा समाजातील आमदारांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे. हे आमदार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्टंटबाजी करीत आहेत. त्यांना सर्वच समाजाने निवडूण दिले आहे. 

विधानसभेत आवाज उठवून शासनानवर दबाव आणण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्यामुळे राजीनामा देणे म्हणजे स्वतःची जबाबदारी झटकल्यासारखे आहे. तुम्हाला समाजाने विश्वासाने निवडून दिले आहे. असेच राजीनामे द्याल तर समाज माफ करणार नाही. राजीनाम्याची ही स्टंटबाजी तातडीने थांबवा असे आवाहन देखील जावळे यांनी केले आहे. मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे निघूनही दखल न घेतल्याने उद्रेक सुरु आहे. तरुण बलिदान देत आहेत. राज्य शासन नुसत्या घोषणा करीत आहे. अंमलबजावणी मात्र काहीच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्य्‌ृूचे दुःख होते पण शेतकरी आत्महत्या करीत आहेत, आरक्षणासाठी तरुण बलिदान देत आहेत, याचे दुःख मात्र त्यांना होत नाही. 

यापुढे निवडणुकीसाठी ते आले तर त्यांच्या सभा उधळून लावल्या जातील, असा इशाराही जावळे पाटील यांनी यावेळी दिला. सन्यवक नसलेल्यांशी चर्चा करून शासन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नये. त्याने प्रश्न सुटणार नाही. आंदोलन करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्याचा अवलंब करा, असे आवाहन देखील समाजातील तरुणांना केले. आमदारापेक्षा मराठा समाजातील खासदारांनी राजीनामे दिले तर केंद्र सरकारला घाम फुटेल असे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील म्हणाले. आरक्षणाचा विषय न्यायालयात आहे. तेथे शासनाने योग्य बाजू मांडणे गरजेचे आहे. तोपर्यंत शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठी तरतूद केली, शैक्षणिक शुल्कात 50 टक्के सवलतीचा आदेश काढला, मेगा भरतीला स्थगिती दिली तर आक्रोश कमी होईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

संबंधित लेख