छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव निघाले की मराठी माणूस एकत्र येतो - शरद पवार 

"छत्रपती शिवाजी महाराज हे असे नाव आहे की ज्यासाठीदेशाच्या कानाकोपऱ्यातील मराठी माणूस एक होतो. न्यूयॉर्कमध्ये मराठी माणूस शिवजंयती साजरी करताना मी पाहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी माणसांना जोडणारा दुवा आहेत.
SHARAD_PAWAR_RAJ_THAKARE
SHARAD_PAWAR_RAJ_THAKARE

पुणे  : "छत्रपती शिवाजी महाराज हे असे नाव आहे की ज्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील मराठी माणूस एक होतो. न्यूयॉर्कमध्ये मराठी माणूस शिवजंयती साजरी करताना मी  पाहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी माणसांना जोडणारा दुवा आहेत. भारतात आणि जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे, तेथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते,'' असे शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या प्रश्‍नाचे उत्तर देताना सांगितले.

बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोर यांचे नाव घेतले की, बंगाली माणूस एकत्र येतो. पंजाबी माणूस गुरुनानकांचे नाव घेतले की एकत्र येतो. असा महाराष्ट्रासाठी हूक-सर्वांना एकत्र आणणारे काय आहे? असा प्रश्‍न राज ठाकरे यांनी विचारला होता. त्यावर श्री. शरद पवार असे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज हे असे व्यक्तिमत्त्व आहे की त्यांच्या  नावावर संपूर्ण मराठी माणसे एकत्र येतात. छत्रपती शिवाजी महाराजांकडे कोणी जात म्हणून पाहात नाही तर महाराष्ट्राची अस्मिता म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते.''

त्यावर राज ठाकरे यांनी विचारले, असे जर आहे तर आपण महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा आहे असे का म्हणत नाही? आपल्या भाषणात नेहमी फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असा उल्लेख का करता?

यावर शरद पवार म्हणाले, "महाराष्ट्र म्हटल्यावर पहिले स्मरण शिवाजी महाराजांचेच होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे चिरकाल टिकणारे आहे. मात्र तरुण पिढीला फुले-शाहू-आंबेडकर यांच्या सामाजिक ऐक्‍यासाठी आणि प्रबोधनासाठीच्या कार्याचे स्मरण करून द्यायचे म्हणून मी त्यांचा उल्लेख करतो. त्यांनी जात-पात-धर्मरहित मराठी समाज निर्मितीचे स्वप्न पाहिले आणि मराठी माणूस एकसंध केला. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात जातीय शक्ती डोके वर काढीत असताना त्यांचे स्मरण अपरिहार्य आहे. सत्तेत असलेल्या काही प्रवृत्ती समाजात कप्पे निर्माण करून फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत . पण महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांच्याच मार्गाने जाईल अशी मला खात्री आहे.''

प्रबोधनकार ठाकरे यांनी समाज प्रबोधनासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख श्री. पवार यांनी यावेळी केला. शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांनीही जातीपातींचा विचार न करता संघटन उभे केले असे सांगून श्री. शरद पवार म्हणाले, " बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझे राजकीय मतभेद होते पण त्यांनी संघटन उभे करताना जातीला नाही तर कर्तृत्वाला महत्त्व दिले हे नमूद करावेसे वाटते. औरंगाबादेत चंद्रकांत खैरेंसारखा सुतार-बुरूड समाजाचा कार्यकर्ता आमदार केला. मंत्रिपद दिले आणि पाच वेळा खासदार म्हणूनही लोकसभेवर पाठविले. खैरेंच्या जातीचे पाच हजार मतदारदेखील त्यांच्या मतदारसंघात नाहीत. याच पद्धतीने त्यांनी साबीर शेख यांनाही मंत्री केले. अशी वेगवेगळ्या समाजाची त्यांनी माणसे पुढे आणली.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com